ठाणे : भिवंडीत लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराच्या गुप्तांगावर चाकूने वार

प्रेयसीवर गुन्हा दाखल; तपास सुरू
क्राईम न्यूज
क्राईम न्यूजfile photo
Published on
Updated on

भिवंडी : २६ वर्षीय प्रेयसीने ३१ वर्षीय प्रियकराला इंस्टाग्रामवर कॉल करून घरी बोलावले. त्यानंतर दोघे शारीरिक संबंध करत असतानाच, प्रेयसीनं प्रियकाराकडे लग्राचा अहट्टास केला. मात्र लग्नास प्रियकराने नकार देताच प्रेयसीने भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकराच्या गुप्तांगावर वार केले. खळबळजनक बाब म्हणजे १६ ऑगस्ट रोजी प्रेयसीने स्वरक्षणासाठी उलथानाने प्रायव्हेट पार्टवर हल्ला केल्याची तक्रार देऊन प्रियकरावरच भिवंडी शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४,७५ (१) (२) सह ३३३ न्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलीस तपासात या घटनेला कलाटणी मिळाल्याने प्रियकराच्या तक्रारीवरून १९ ऑगस्ट रोजी हल्लेखोर प्रेयसीवर कलम ११८ (१) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील एका इमारतीत २६ वर्षीय प्रेयसी राहते. तर तिचा ३१ वर्षीय प्रियकर याच भागात राहतो. दोघांचे प्रेमाचे सूत जुळल्याने अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. त्यातच १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे चार वाजल्याच्या सुमारास प्रेयसीने प्रियकराला इंस्टाग्रामवर कॉल करून त्याला आपल्या घरी बोलवले. प्रेयसीच्या घरी गेल्यानंतर शाररीक संबंध करत असतानाच, प्रियकराकडे प्रेयसीने लग्न करण्यासाठी तगादा लावला. मात्र त्याने नकार देताच तिने भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर चाकूने वार केले. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने प्रियकराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, घटनेच्या दिवशी प्रेयसीने पोलिसांची दिशाभूल करून घरी एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने घाबरलेल्या अवस्थेत घरातच आरडाओरड करीत घरातील स्वयंपाक खोलीत आपली अन्नू वाचविण्यासाठी गेली. आणि त्यावेळी स्वयंपाक खोलीत लगट करतानाच स्वरक्षणासाठी उलथानाने प्रायव्हेट पार्टवर हल्ला केल्याची तक्रार दिली होती, मात्र पोलीस तपास आणि उपचारातून बरा झाल्यानंतर प्रियकराच्या जबानीत वेगळाच प्रकार समोर आल्याने पोलिसांनी १९ ऑगस्ट रोजी प्रेयसीवर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news