Illegal Minor Mineral Mining : मेट्रो ठेकेदार जे. कुमार कंपनीकडून गौण खनिजाची तस्करी

नवी मुंबईतील १३ कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश; एका हॉस्पिटलसह १३ कंपन्यांना १७ कोटी ९७ लाखांचा दंड
Illegal Minor Mineral Mining
Illegal Minor Mineral Miningpudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : गौण खनिजांची बेकायदेशीर उत्खनन केल्याप्रकरणी नवी मुंबईतील एका हॉस्पिटलसह १३ कंपन्यांना १७ कोटी ९७ लाखांचा दंड ठोठण्यात आला आहे. मात्र हा दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या या सर्व कंपन्यांवर सरकारी महसूल बुडविणाऱ्या आणि गौण खनिजांच्या तस्करी करणाऱ्या व्यक्तींवर चोरी, फसवणूक, एमपीडीए अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी १४ पोलीस ठाण्यांना दिले आहेत.

दुसरीकडे ठाणे मेट्रोचे काम करणारी जे. कुमार इन्फ्रा, कंपनीने गौण खनिजाची चोरी केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्याकडून पावणे तीन कोटींच्या दंडाची वसुली करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.

Illegal Minor Mineral Mining
Job Fraud Mumbai : नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्‍या काका-पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे तालुक्यात येणाऱ्या नवी मुंबईतील १३ कंपन्यांनी परवानगी पेक्षा अधिक गौण खजिनांचे उत्खनन करून तस्करी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यासंदर्भांत चौकशी होऊन कंपन्यांना दोषी ठरल्या आहेत. त्यामध्ये नेरुळ येथील सेक्टर १३ मधील मे. कल्पना स्ट्रक्चओं, घणसोली प्लॉट ३६ मधील हसमुख मनानी, अर्जुनवाडीमधील मीना हॉस्पिटल, प्रमोद धनाजी पाटील, सेक्टर ८ मधील मे. नीलकंठ इन्फर्टेक कंपनी, वाशी येथील राजीव गांधी जोगांर्स पार्क येथील दीपा इंजिनिअरिंग, तुर्भे येथील दामोदर टेक इंटरनॅशनल प्रा. लि, तिरुपती इंटरप्रायजेस तर्फे हरिष रूपानी, मौजे करावे येथील अमित रुपारेल, जुईनगर रेल्वे स्टेशनजवळील साई प्रोजेक्त आणि तिरुपती इंटरप्राइझेज तर्फे हरिष रूपानी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कंपन्यांनी बेकायदेशीपणे गौण खनिजांचे उत्खनन करीत सरकारी महसूल बुडविला आहे.

याबाबत तहसीलदार यांनी चौकशी करून संबंधित कंपनींना दंडात्मक कारवाई केली. मात्र या कंपन्यांनी दंडाची रक्कम भरली नसल्याने तहसीलदार उमेश पाटील यांनी १४ पोलीस ठाण्यांना पत्र पाठवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. तसेच एमपीडीए अंतर्गत गुन्हेही दाखल करून जप्तीची कारवाईकरण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिलेले आहेत. त्यामुळे गौण चोरी करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Illegal Minor Mineral Mining
Floating Palace Mumbai : समुद्रात शाही विवाह सोहळ्यासाठी उभारला जातोय जलमहाल

मेट्रोचा ठेकेदार जे. कुमार कंपनीला पावणे तीन कोटीचे दंड

घोडबंदर रोडवरील कासारवडवली ते भाईंदर पाडा (गायमुख) या दरम्यान मेट्रोच्या कामासाठी २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. हे खोदकाम अधिकृत परवानगी पेक्षा जास्त असल्याच्या तक्रारी ठाणे तहसीलदार कार्यालयात करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने चौकशी होऊन चे कुमार यांनी परवानगी पेक्षा ३ हजार ५४९ ब्रास माती अधिकचे उत्कलन केल्याचे सिद्ध झाले. अंतिम सुनावणीनंतर जे. कुमार इन्फ्रा प्रोजेकट कंपनीला पाहणे तहसीलदारांनी २ कोटी ७२ लाख २ हजार ९२८ कोटींचा दंड आकाराला. ही रक्कम भरण्यास जे. कुमार इन्फ्रा प्रोजेकट कंपनी टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार उमेश पाटील यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.