Thane Illegal Construction : तीन महिन्यात 264 अनधिकृत बांधकामांवर हातोडा

198 बांधकामे जमीनदोस्त, 50 जणांवर गुन्हे दखल; ठाणे महापालिकेची कारवाई
Thane Illegal Construction : तीन महिन्यात 264 अनधिकृत बांधकामांवर हातोडा
Published on
Updated on

ठाणेः न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाणे महापालिकेने जून पासून ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून तीन महिन्यात २६४ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने हातोडा चालवला आहे. तर यापैकी जवळपास १९८ बांधकामे जमीनदोस्त केली असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी ५० जणांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

अनधिकृत बांधकामांमुळे गोत्यात आलेल्या ठाणे महापालिकेने जून २०२५ पासून शहरात कारवाईला सुरुवात केली आहे. केलेल्या कारवाईचा तपशील न्यायालयात द्यावा लागत असल्याने पालिकेने एवढ्या तत्परतेने या कारवाईला सुरुवात केली आहे. आतापर्यंत किती बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे याचा आढावा स्वतः महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. या आढावा बैठकीस, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक नगररचना संचालक संग्राम कानडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, विधी अधिकारी मकरंद काळे, सर्व प्रभाग समितीचे सहायक आयुक्त उपस्थित होते.

Thane Illegal Construction : तीन महिन्यात 264 अनधिकृत बांधकामांवर हातोडा
Illegal Construction: कोंढवा परिसरात अनधिकृत बांधकामांवर हातोडा; 3 हजार 800 चौरस फुटांचे बांधकाम पाडले

कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरू राहू नये यासाठी सर्व यंत्रणेने दक्ष राहावे. तसेच, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक त्या प्रकरणात तातडीने एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त राव यांनी दिले आहेत. गुन्हे दाखल करताना प्रत्यक्ष पाहणी आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून अचूक माहिती नोंदवावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. ज्या अनधिकृत बांधकामांचे पाडकाम शिल्लक असेल त्याचे प्रवेश मार्ग (जिने) पाडून पत्रे लावून बंद करावेत, असेही त्यांनी म्हटले.

अनधिकृत इमारतींमध्ये घर घेऊ नका

अनधिकृत बांधकामात घर घेऊ नये असे आवाहन करणारे फलक मोक्याच्या जागी लावावेत. नागरिकांनाही घर खरेदी करताना बांधकाम अधिकृत असल्याची खात्री महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून करून घ्यावी, असे आवाहनही आयुक्त राव यांनी केले आहे. अधिकृतपणे ज्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे त्या सर्व ठिकाणी दर्शनी भागात क्यू आर कोड लावण्यात आले आहे. ते क्यू आर कोड मोबाईलवर स्कॅन करून बांधकाम परवानगीची माहिती कोणालाही उपलब्ध होऊ शकते, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

(जून ते सप्टेंबर २०२५ पर्यंतची कारवाईची आकडेवारी)

  • नौपाडा-कोपरी - ०१

  • दिवा - ११

  • मुंब्रा - १३

  • कळवा ०४

  • उथळसर ०१

  • माजिवडा-मानपाडा - ०५

  • वर्तक नगर - ०८

  • लोकमान्य नगर - सावरकर नगर- ०७

  • वागळे इस्टेट - ००

  • एकूण - ५०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news