

ठाणे : फाल्गुन महिन्यात येणारा होळीचा सण उत्साह आणि जल्लोषाची पर्वणी असते. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात ‘शिमगा’ म्हणजेच ‘होळी’ हा सण साजरा करण्याची पारंपारिक प्रथा वर्षांनुवर्षांपासून चालत आली आहे. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात होळी साजरी करण्यात आली. विविध रंग उधळून एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.