Thane Heavy Rain warning ! ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा; घाबरु नका, येथे संपर्क साधा

ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन
ठाणे
नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे ठाणे जिल्हा प्रशासनाचे आवाहनPudhari News Network
Published on
Updated on
Summary

ठळक मुद्दे

  • मदतीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधा

  • शाळा, महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत पावसाच्या अंदाजानुसार आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेणार

  • जिल्ह्यातील खाडी आणि नदी, नाला नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्कतेचा इशारा

Heavy rain warning for Thane district today

ठाणे : ठाणे जिल्ह्याला मंगळवार (दि.19) आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून प्राप्त झाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व विभागांमध्ये सतर्क ठेवण्यात आली आहे.

ठाणे
Thane Rains | कोपरी परिसरात घरांमध्ये पाणी; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पाहणी

येथे साधा संपर्क

जिल्ह्यातील खाडी आणि नदी / नाला इ. पाण्याकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी तसेच अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी 022- 25301740 किंवा 9372338827 या क्रमांकावर अथवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

ठाणे
Thane Rains | कोपरी परिसरात घरांमध्ये पाणी; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पाहणी

शाळांच्या उद्याच्या सुट्टीबाबत आज होणार निर्णय

आपत्ती अधिनियमाच्या तरतुदींच्या अनुषंगाने आज सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त उर्वरीत कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडणेबाबत कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या स्तरावरून निर्णय घेण्याबाबत कार्यालयप्रमुखांना निर्देशित करण्यात आले आहे. बुधवार (दि.20) रोजी शाळा, महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत पावसाच्या अंदाजानुसार आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असेही ठाणे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news