Thane Flood News | नद्या गाळाने भरल्या; शहरे पाण्याने तुंबली, नागरिकांची तारांबळ

Thane Flood News: ठाणे शहरात 25 ते 30 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना; पुराची टांगती तलवार
pudhari
ठाणे शहरात 25 ते 30 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटनाpudhari news network
Published on
Updated on

ठाणे : कोकणातील प्रमुख पाच शहरांत जुलैच्या अतिवृष्टीत पाणी घुसले. यामध्ये ठाण्यातील बदलापूर, भिवंडी, कल्याण शहरामध्ये तर रस्त्यावर तळी साचल्याने वाहतूककोंडी झाली. रायगड जिल्ह्यात महाडमध्ये सावित्रीचे पाणी आले. रोह्यात कुंडलिकाचे पाणी घुसले आणि नागोठण्यात आंबा नदीचे. दक्षिण कोकणात जगबुडी, वाशिष्ठी, गडनदी यांचे पाणीही काही भागात घुसले होते. या सर्व पाणी घुसण्याचे कारण नद्यांमधील गाळ हेच होते. (The cause of water entering the houses was the silt in the rivers.)

शहरांना पाणी सोसवेना आणि नद्यांना पूर सोसवेना अशी स्थिती कोकणात सर्व भागात होती. एका बाजूला धरणे भरल्याने शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. पण दुसर्‍या बाजूला शहरे तुंबत राहिल्याने नागरिक हैराण झाले. ठाणे शहरात 25 ते 30 ठिकाणी पाणी साचण्याची घटना घडल्या. यामध्ये दिवा, कळवा, मुंब्रा या भागांचा समावेश आहे. लोकांचे संसार पाण्यात बुडाले. उल्हास नदीला पूर आल्याने बदलापुराठायी सखल भागात पाणी शिरले. बदलापूरच्या पूररेषेचा प्रश्न गेले अनेक दिवस गाजत आहे. पूररेषा निश्चित करताना अनेक नागरी वस्त्या त्या रेषेत आल्या आहेत. बदलापूर पश्चिम येथे 70 ते 80 घरांमध्ये पाणी शिरले होते. सध्या दीड लाख लोक पूररेषेच्या परिघात राहत आहेत. त्यांचा प्रश्न सध्या जटिल आहे. नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने कल्याण, डोंबिवली, भिवंडी येथेही पाणी तुंबले होते. दुसर्‍या बाजूला रायगड जिल्ह्यात आंबा, कुंडलिका आणि सावित्री नद्यांचे पाणी नागरी वस्तीत शिरले होते. या नद्यांचा गाळ काढला जात नसल्याने आणि काढलाच तर नदीच्या बाजूलाच फेकला जात असल्याने पुन्हा तो गाळ नदीत येऊन नद्या भारतात. त्यामुळे प्रामुख्याने पुराचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरत आहे. या पुरामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

25 जुलैचा पूर सर्वांनाच हादरवणारा होता. पूररेषा निश्चित करून नागरी वस्त्यांचे स्थलांतर हा यासाठी मार्ग आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिकांच्या मागणीनंतर जलसंपदा विभागाने पूररेषेची पुनर्तपासणी त्रयस्त संस्थेकडून करण्याचे सुचवले होते. त्यानुसार आयआयटी रूरकीकडे यासाठी विनंती करण्यात आली. मात्र त्यासाठीच्या खर्चाची पूर्तता न केल्याने तो प्रस्ताव बारगळला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता नरेंद्र महाजन यांनी दिली आहे.

पुराची टांगती तलवार

सर्वच नद्यांची पूररेषा निश्चित करून नागरी वस्त्या स्थलांतरित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. परंतु त्याची कार्यवाही मात्र कागदावरच आहे. तुंबलेल्या शहरांमध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल, नागोठणे, गोवा, महाड या शहरांचाही समावेश होता. तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, मालवण भागात पुराचे पाणी येण्याचे प्रमाण अधिक आहे. या दरवर्षीच्या पुराच्या टांगत्या तलावारीमुळे नागरिक हैराण आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news