Thane Double Decker Bus | ठाण्यात धावली पहिली डबल डेकर बस; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका भवन येथून लुईसवाडी ते पुन्हा महापालिका भवन असा केला प्रवास
Double Decker Bus
Double Decker BusPudhari
Published on
Updated on

Thane Municipal Transport

ठाणे : मुंबईनंतर पहिल्यांदा ठाण्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरू झाली असून महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका भवन येथून लुईसवाडी ते पुन्हा महापालिका भवन असा प्रवास या डबलडेकर बसमधून केला. या बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Double Decker Bus
Thane electricity crisis : ठामपा, एमएमआरडीएच्या नियोजनशून्य कारभारामुळे दोन लाख ग्राहक अंधारात

यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, महापालिका सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जी.सी.सी तत्वावर या बसेस ठाणे परिवहनमध्ये दाखल होणार असून त्याचा कोणताही भार परिवहन सेवेवर पडणार नाही. या डबलडेकर बसमध्ये एकाचवेळी 65 प्रवासी बसू शकतात. तर 33 प्रवासी उभे राहून प्रवास करु शकतील.

सद्यस्थितीत ही बस तीन हात नाका ते गायमुख या मार्गावर धावणार आहे. इलेक्ट्रिक बस असल्यामुळे ठाणेकरांचा प्रवास पर्यावरणपूरक असा होणार असून परिवहन ताफ्यात आणखी 9 बसेस लवकरच दाखल होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news