Thane Fire News | पी अ‍ॅण्ड टी कॉलनीतील झोपड्यांना भीषण आग

झोपड्यांना भीषण आग; जीवितहानी नाही
डोंबिवली पूर्वे पी अ‍ॅण्ड टी कॉलनी
पी अ‍ॅण्ड टी कॉलनीमधील मीलन पॅलेस सोसायटी लगतच्या झोपड्यांना आग लागलीpudhari news network
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या पी अ‍ॅण्ड टी कॉलनीमधील मीलन पॅलेस सोसायटी लगतच्या झोपड्यांना सोमवारी (दि.12) रोजी सकाळी भीषण आग लागली. या भागात जनावरांचा गोठा देखिल आहे. अचानक आग लागल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली होती. आग मिलन पॅलेस सोसायटीच्या पाणी पुरवठा पंपापर्यंत पोहोचली असती तर मोठा अनर्थ घडला असता. रहिवाशांनी तात्काळ हालचाली करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही.

मीलन पॅलेस सोसायटीच्या पाठीमागील बाजूस बेकायदा झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. या भागात जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यातील मलमुत्रामुळे परिसरातील रहिवासी अनेक वर्षांपासून हैराण आहेत. बेकायदा बांधकामांवर केडीएमसीने कारवाई करण्याची या भागातील रहिवाशांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेतली जात नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. या झोपड्यांमुळे परिसरात घाण पसरते. तेथूनच नालाही वाहतो. या नाल्यात झोपडीधारकांकडून कचरा टाकला जात असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.

झोपड्यांसह जनावरांचा गोठा हटविण्याची मागणी

सोमवारी सकाळी परिसरातील रहिवासी कामावर जाण्याच्या घाईत असताना अचानक या भागातील झोपड्यांना आग लागली. रहिवासी तातडीने घरातून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले होते. या झोपड्यांवर प्लास्टिकचे छत आणि ज्वलनशील वस्तू असल्याने आगीने पेट घेत आग मीलन पॅलेस सोसायटीच्या पाणी पुरवठा करणार्‍या पंपापर्यंत पोहोचली होती. मात्र रहिवाशांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. केडीएमसीने या बेकायदा झोपड्यांसह जनावरांचा गोठा हटविण्याची मागणी रहिवासी करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news