ठाणे : एन्काऊंटर | तरीही बालिकेवर लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबेना

नालासोपारामध्ये बाललैंगिक अत्याचार प्रकरणी एक आरोपी अटकेत, तर एक फरार
child abuse
चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनांनी जनप्रक्षोभ वाढला आहे. pudhari news network
Published on
Updated on

विरार : नालासोपारा येथे एका 7 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून एक अल्पवयीन आरोपी फरार आहे.

child abuse
Nashik News | चिंताजनक! शहरातही चिमुकल्या असुरक्षित

पीडित मुलगी ही सात वर्षांची असून मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास आरोपी शुभम वर्मा (30) आणि एका 14 वर्षीय विधीसंघर्षित मुलाने तिला नालासोपारा धानीवबाग येथील एका गल्लीतील गाळ्यात नेले. वर्मा याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला तर विधीसंघर्ष मुलाने त्या प्रसंगाचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. हा प्रकार पीडित मुलीने घरी येऊन आपल्या आईला सांगितला.

पीडित मुलीच्या आईने तात्काळ पेल्हार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 65(2), 77 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आम्ही एका आरोपीला अटक केली आहे तर दुसरा फरार आरोपीचा शोध घेत आहे, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.

परिसरात भीतीचे वातावरण

नालासोपारा परिसरातील सामूहिक लैंगिक अत्याचाराची महिन्याभरातील ही सातवी घटना आहे. यापैकी चार गुन्हे आचोळे पोलीस ठाण्यात, दोन गुन्हे तुळींज पोलीस ठाण्यात तर एक गुन्हा पेल्हार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news