

डोंबिवली : दिवा-शिळ रस्त्यावरील चंद्रांगण रेसिडेन्सी गृहसंकुलातील दत्त मंदिरामध्ये उद्या शनिवारी (दि.14) दत्त जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
सोहळ्यानिमित्त शनिवारी (दि.14) सकाळी 9 ते दुपारी 4 आणि सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत दिवा विभागातील विविध भजनी मंडळांकडून सुस्वर भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सायंकाळी 6 वाजता हभप अनंत महाराज पाटील (हेदुटणे) यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
मंदिरात दत्त जन्मोत्सवाचा सोहळा अतिशय भव्यदिव्य प्रमाणात धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संपन्न होत असतो. सोहळ्याला 23 गावे एकादशी ग्रुप (दिवा, शिळ, देसाई, दहिसर विभाग) तसेच कल्याण ग्रामीण परिसरातील वारकरी संप्रदायाची साथ लाभते. दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक भक्तगण मंदिरामध्ये दर्शनाकरिता येत असतात. या निमित्ताने दत्त जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक माजी आमदार सुभाष भोईर यांनी केले आहे.
या सोहळ्यानिमित्त हभप बाळकृष्ण महाराज पाटील (आयरे)
महंत हभप चेतन महाराज म्हात्रे (डोंबिवली : अध्यक्ष - वारकरी संप्रदाय : ठाणे-रायगड जिल्हा), हभप बबन महाराज म्हात्रे (सोनारपाडा)
हभप प्रकाश महाराज म्हात्रे (सोनारपाडा)
हभप गणेश महाराज ठाकूर (सोनारपाडा)
हभप अनंत महाराज पाटील (बेतवडे)
हभप रमेश महाराज पाटील (दातिवली)
हभप शिवाजी महाराज पाटील (सोनारपाडा)
हभप जगन्नाथ महाराज पाटील (उत्तरशिव-उपाध्यक्ष 23 गावे एकादशी ग्रुप (दिवा, शिळ, देसाई, दहिसर विभाग)
हभप नारायण महाराज भोईर (दिवा स्टेशन)
हभप प्रकाश महाराज दळवी (दातिवली) आणि हभप हनुमान महाराज पाटील (कोळेगाव) आदी कीर्तनकार / प्रवचनकार उपस्थित राहणार असल्याचेही माजी आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले.