भिवंडी : अमली पदार्थांच्या विळख्यात ठाणे जिल्ह्यातील तरुणाई गुरफटत असतानाचा भिवंडी शहरात ही त्याचा वापर वाढू लागला आहे. भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून 21 लाख 20 हजार रुपये किमतीचा 106 ग्रॅम एमडी व 15 लाखांची बी एम डबल्यू कार व पिस्टल असा एकूण 37 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.
शहरातील हद्दपार केलेला मोहम्मद अली अब्दुल अजीज शेख हा शहरात एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पो.निरी विनायक गायकवाड, पो.निरी.विनोद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या नेतृत्वाखाली रिजवान सैय्यद, श्रीकांत धायगुडे, मनोज मुके, दिपक सानप, रूपेश जाधव, प्रशांत बर्वे यांनी त्यास हटकले. तो पळत असताना पाठलाग करून त्यास अटक केली केली आहे. त्याच्या जवळून 11 लाख 20 हजार रुपये किमतीचा 56 ग्रॅम एमडी जप्त केला. त्या दरम्यान तपासात नाशिक येथील दोनजण एमडी घेऊन येणारा असल्याची माहिती मिळाल्या वर साईबाबा मंदिर परिसरात पोलिस पथकाने सापळा रचून संशयित कार मधील दोघा जणांची झडती घेतली. त्यांच्या जवळ 10 लाख रुपये किमतीचा 50 ग्रॅम एमडी आढळून आले. मुज्जफर मोबिन शेख व समीर फिरोज रोकडीया दोघे रा.नाशिक रोड असे ताब्यात घेतलेल्या दोघा जणांची नावे आहेत.त्यांच्या जवळील पिस्टल व 1 लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल कार असा एकूण 37 लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.