

ठाणे : एकीकडे ठाणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असताना दुसर्या बाजूला साथजन्य आजारांचा धोका वाढत आहे. जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, जिल्ह्यात मागील आठवड्यात डेंग्यूचे 42 तर मलेरियाचे 48 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या सहा महिन्यांत जानेवारी ते जून या दरम्यान जिल्ह्यात 299 रुग्णांना मलेरियाची तर 150 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन मलेरिया आणि डेंग्यूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अॅनाफिलीस नावाच्या संक्रमित मादी डासाच्या चाव्यामुळे मलेरियाचा विषाणू शरीरात जातो. हा डास चावल्यावर 8 ते 14 दिवसांत ताप येतो. तर एडीस इजिप्ती या मादीचा डास चावल्यामुळे डेंग्यू होतो.
डेंग्यूमुळे रुग्णांना सांधेदुखीचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. डेंग्यू रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाच्या तापापासून वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
सध्या ताप, सर्दी, खोकला आणि अंगदुखी आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. त्यामुळे वेळीच रक्ताची चाचणी करण्याचा सल्लाही वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. ठाणे जिल्ह्यात जानेवारीपासून जूनअखेर मलेरियाच्या 299 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 150 जणांना डेंग्यूचा संसर्ग झाला आहे. तर मागील आठवड्यात डेंग्यूचे 42 तर मलेरियाचे 48 रुग्ण आढळून आले आहेत.
यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रात डेंग्यू मलेरिया संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, पावसाळ्यात असे आजार अधिक बळावत असल्यामुळे दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि थंडी वाजणे, खूप ताप येणे.
सांधेदुखी, शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होणे, शरीरावर गुलाबी रंगाचे
रॅशेस दिसणे
आठवड्यातून एकदा साठवलेले
पाणी पूर्णपणे रिकामे करणे.
पाणी साठवणार्या टाक्या, ड्रम्स इत्यादी झाकून ठेवणे.
प्लास्टिक, बाटल्या, टायर यांचा योग्य निपटारा करणे.
गटार, नाल्यांची नियमित सफाई.
पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे, विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या वेळेत.
डास प्रतिबंधक क्रीम, लोशन वापरणे.
डास जास्त असलेल्या भागात जाणे टाळणे.