Thane | भिवंडी महानगरपालिकेत तंत्र-मंत्राच्या प्रकाराची चर्चा

आयुक्तांच्या दालनाबाहेर लावलेल्या मडक्यामुळे शहरात चर्चेला आले उधान
Thane | भिवंडी महानगरपालिकेत तंत्र-मंत्राच्या प्रकाराची चर्चा
Published on
Updated on

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील तिसर्‍या मजल्यावर आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या संरक्षक लोखंडी प्रवेशद्वारावर लोंबकळलेले विधिपूर्वक लावलेले मातीचे मडके, आपल्या सरकारी कार्यालयाच्या दारावर आयुक्तांनी सहीनिशी लावलेले सील, त्या दरवाज्यावर हनुमानाचा फोटो आणि खुद्द आयुक्तच अचानक रजेवर जाणे या सर्व गूढतेच्या घटनांनी संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून आयुक्त कार्यालय हे आता प्रशासकीय केंद्रापेक्षा तांत्रिक केंद्रासारखा भासत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

यापूर्वी देखील महानगरपालिकेच्या उद्घाटना नंतर काही दिवसांनी महानगरपालिकेच्या तळमजल्यावर तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकार्‍यांच्या सांगण्याने पालिकेच्या कर्मचार्‍यांनी होमहवन विधी केले होते.आता पुन्हा एकदा आयुक्तांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील गूढ मडक्याने मनपात भानामतीचा प्रकार होत असल्याने चर्चेचे केंद्र बनली आहे.याचे कारण म्हणजे पालिकेत रुजू झाल्यापासून आयुक्त अजय विलास वैद्य यांची अनाकलनीय आणि वादग्रस्त कृती. पालिकेतील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या पालिका अधिकार्‍यांचा अंधश्रद्धा आणि जादूटोणाचा नवा चेहरा समोर आला आहे.याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या पदाधिकार्‍यानी पोलीस ठाण्यात आणि राज्यशासनाकडे तक्रार केली आहे.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजय विलास वैद्य यांनी आपल्या कार्यालयीन सहकारी कर्मचार्‍याच्या सहकार्याने जादूटोणा, तांत्रिक मांत्रिक यांचे काम करणारा तथाकथित बाबा (नाव माहीत नाही) यांनी सार्वजनिक मालमत्ता असलेल्या मनपाच्या मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ महाराष्ट्र राज्य अंधश्रध्दा निर्मूलन कायदा प्रतिबंधीत असे कर्मकांड केलेले आहेत. या कर्मकांडातून बाहय भागातील जाळीवर उलटे मडक्याचे झाकण लटकविले आहे. तसेच कर्मकांड केलेले इतर साहित्य आयुक्त यांचे टेबल व खुर्ची खाली तसेच अन्टी चेंबरमध्ये असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

अंधश्रध्दा निर्मूलन कायद्यान्वये कार्यवाही करा

आयुक्त कार्यालयाचे सी.सी.टी.व्ही. नियत्रंण अजय वैद्य त्यांच्या वैयक्तीक ताब्यात आहे.त्यामुळे मागील सहा महिन्याचे सी.सी.टी.व्ही. चित्रण पोलिसांनी ताब्यात घेऊन आयुक्त तथा प्रशासक अजय विलास वैद्य, लिपीक सुदाम जाधव, तथाकथीत जादूटोणा तांत्रिक मांत्रिक विद्या करणारा तथाकथित बाबा यांचेवर महाराष्ट्र राज्य अंधश्रध्दा निर्मूलन कायदयान्वये तसेच इतर संबंधीत कायद्याद्वारे गुन्हा नोंद होऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी आरोप वजा तक्रार शिवसेना उबाठा शहर सचिव गोकुळ कदम यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात केली आहे. सध्या पालिका आयुक्त अजय वैद्य हे 3 जानेवारीपर्यंत दीर्घकालीन सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे महानगरपालिका कार्यालयात आणि शहरात चर्चेचा विषय बनला असून नागरिकांना माहिती मिळाल्यानंतर काही जागृत नागरिक खात्री करण्यासाठी पालिकेत येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news