Thane | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला लघुउद्योजकांशी संवाद

‘बिझनेस जत्रा-2025’
ठाणे
सॅटर्डे क्लबच्या वतीने ठाणे शहरातील टिप टॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘बिझनेस जत्रा-2025’ या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून लघुउद्योजकांशी संवाद साधला. Pudhari News network
Published on
Updated on

ठाणे : सॅटर्डे क्लबच्या वतीने ठाणे शहरातील टिप टॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘बिझनेस जत्रा-2025’ या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून लघुउद्योजकांशी संवाद साधला. महाराष्ट्राला उद्योगांची मोठी आणि समृद्ध परंपरा असून मराठी उद्योजकही आता पुढे येत अनेक क्षेत्रात व्यवसाय करत आहेत ही आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले. राज्यात महायुतीचे सरकार असताना उद्योजकांना पूरक असे निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही केला असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आज राज्य थेट परदेशी गुंतवणुकीत देशात क्रमांक एकवर आहे. आधीच्या राजवटीत उद्योजकांना पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने त्यांनी राज्याबाहेर जाण्याचा निर्णय घेतला असला तरी यापुढे असे काहीही होणार नाही असे निक्षून सांगितले. उद्योग मंत्री हे उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून तुमच्या कोणत्याही समस्या असतील त्या सरकारच्या माध्यमातून नक्की सोडवण्यात येतील. मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात 1.5 ट्रीलीयन डॉलरची उलाढाल करण्याची क्षमता असल्याचे नीती आयोगाचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने आपल्या सर्वांना मिळून काम करायचे आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक उद्योजकाचा उद्योग पुढील वर्षी दुप्पट व्हायला हवा अशी अपेक्षा यासमयी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news