Thane Crime :डिलिव्हरी बॉय निघाला मोटरसायकल चोरटा

मोटरसायकलसह चोरट्याला अटक; उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई
Thane Crime News
डिलिव्हरी बॉय निघाला मोटरसायकल चोरटा
Published on
Updated on

उल्हासनगर : कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यात उल्हासनगर गुन्हे शाखेला मोठे यश मिळवले आहे. स्विगी डिलिव्हरी बॉयच्या वेशात मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला बुधवारी (दि.२) अटक करून त्याच्या ताब्यातून मोटरसायकल हस्तगत करण्यात आली. दुसऱ्या गुन्ह्यातील बुलेट चोरी बाबतही त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे.आकाश नागरे असे या मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे.

४ जून रोजी दुचाकी चोरीप्रकरणी तर २४ जून रोजी बुलेट चोरी प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी अमर कदम यांना मिळालेल्या गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून संबंधित आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यावेळी आरोपी आकाश नागरे हा स्विगी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असतानाच चोऱ्यांचे सत्र राबवत असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी, पोलिस कर्मचारी अमर कदम, मंगेश जाधव, रामदास उगले, प्रसाद तोंडलिकर व शेरमाळे यांच्या पथकाने स्विगी कंपनीच्या मदतीने तांत्रिक माहिती मिळवून आकाशला राहत्या घरातून अटक केली.

चौकशीदरम्यान, त्याने मोटरसायकल व बुलेट चोरीची कबुली दिली. मोहम्मद इराणी उर्फ अंडू याच्या संगणमताने त्याने आंबिवली येथे बुलेट चोरी केली होती. मात्र, मोहम्मद इराणी हा बुलेट घेऊन पसार झाला आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरीची मोटरसायकल पंचनामा करून जप्त केली असून पुढील कारवाईसाठी आरोपीला कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. याप्रकरणी फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news