ठाणे : कचराकुंडीत सापडले मृत अर्भक

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
अर्भक
अर्भकfile photo
Published on
Updated on

मिरा रोड : काशीमीरा परिसरातील डाचकुल पाडा येथील कचराकुंडीत दोन दिवसाच्या नवजात स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. काशीगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काशीगाव पोलीस ठाणे हद्दीतील डाचकुल पाडा परिसरात महापालिकेचे सफाई कर्मचारी नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी साफसफाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका सफाई कर्मचार्‍याला हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या शाळा परिसरात साफसफाई करत असताना कचर्‍याच्या डब्यात एक अनोळखी नवजात अंदाजे 1 ते 2 दिवसाचे नवजात अर्भक आढळून आले. त्यांनतर त्या सफाई कर्मचार्‍यांनी तत्काळ काशिगाव पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आजुबाजुला चौकशी केली असता त्या नवजात अर्भकाबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. या नवजात अर्भकाला पोलिसांनी पंडित भिमसेन जोशी सामान्य रुग्णालय भाईंदर (प) येथे दाखल केले असता तेथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी नवजात अर्भकास तपासून दाखलपूर्व मयत घोषित केले.

याप्रकरणी अज्ञात इसमाने गुप्तपणे नवजात बालकाच्या जन्माची माहिती लपवून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशीगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news