ठाणे : ‘सिडको’च्या घरांसाठी खारघरला ग्राहकांची गर्दी | CIDCO FLAT

महागृहनिर्माण योजना : सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी नागरिकांकडून गर्दी
सिडको सदनिका महागृहनिर्माण योजना
सिडको सदनिका महागृहनिर्माण योजनाpudhari file photo
Published on
Updated on

पनवेल : ‘सिडको’ने दसर्‍या च्या मुहूर्तावर 26 हजार सदनिकांच्या महागृहनिर्माण योजना साठी जाहीर केलेल्या सोडत प्रक्रियेत खारघर परिसरातील 3,843 घरे उपलब्ध केली आहेत. सदर गृहप्रकल्प खारघर रेल्वे स्थानक आणि नवी मुंबई मेट्रो स्थानक शेजारी असल्यामुळे घरांना पसंती देत तेथील सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी नागरिकांकडून गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ‘सिडको’ने ‘सर्वांसाठी घर’ या योजना अंर्तगत नवी मुंबई आणि पनवेल महापालिका हद्दीत 40 हजार घरांचे काम अंतिम टप्यात आहे. दरम्यान, दसर्‍याच्या मुहूर्तावर महागृहनिर्माण योजना अंतर्गत ‘सिडको’ने 26 हजार सदनिकांची गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये खारघर रेल्वे स्थानकाशेजारी 1803, खारघर सेक्टर-14 डी-मार्ट समोर 1700 तर खारघर गांव मेट्रो स्थानक शेजारी 340 अशी एकूण 3,843 घरे सोडतीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे खारघर रेल्वे स्थानकापासून 50 मीटर अंतरावर गृहनिर्माण प्रकल्पात 15 मजल्याच्या एकूण 17 इमारती असून 540 चौरस फुट चटई क्षेत्रफळ असलेली सर्व घरे टुबीएचके प्रकाराची आहेत. विशेष म्हणजे सदर गृहप्रकल्पालगत खाडीकिनारा आहे. त्यामुळे थंड वातावरण तसेच इमारतीच्या छत आणि गच्चीवरून समुद्रात येणार्‍या भरती-ओहोटीचा आनंद घेता येणार आहे. तर खाडीच्या दुस़र्‍या भागाला नवी मुंबई विमानतळ आहे. तसेच या गृहप्रकल्पाला लागून खारघर-बेलापूर कोस्टल रोड उभारला जाणार आहे.

या गृह प्रकल्पावरुन कोस्टल रोड मार्गे बेलापूर मार्गे मुंबई तसेच नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी सोयीचे होणार आहेत. तसेच सेक्टर- 14 बस डेपो येथे या ठिकाणी 1700 घरे असून सदर घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध आहे. सेक्टर-14 बस टर्मिनस लगत अल्प उत्पन्न गटासाठी 340 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

येथील सदनिकांचे क्षेत्रफळ 322 चौरस फुट चटई असणार आहे. खारघर, सेक्टर-14 मधील गृहप्रकल्प नवी मुंबई मेट्रो मार्गातील खारघर गांव मेट्रो स्थानकालगत आहे. तसेच आजुबाजुला मार्केट परिसर आहे. एंकदरीतच खारघरमधील तीनही गृहप्रकल्प रेल्वे आणि मेट्रो स्थानक पासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे नागरिकांची खारघर मधील घराला अधिक पसंती देत घरे घेऊ इच्छिणार्या नागरिकांची सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी गर्दी वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news