Thane Crime | कल्याणच्या उंबर्डे गावातील रिव्हाॅल्व्हर प्रदर्शनाला कलाटणी

हळदी समारंभात रिव्हाॅल्व्हर नाचवणाऱ्याकडे परवानाच नसल्याचे झाले उघड
डोंबिवली, ठाणे
शरद लोखंडे यांच्या नावे अग्नीशस्त्र वापरण्याचा परवानाच नसल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये शनिवारी (दि.15) गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण जवळ असलेल्या उंबर्डे गावातील हळदी समारंभाच्या कार्यक्रमात शरद लोखंडे हे त्यांच्या हातातील रिव्हाॅल्व्हर सुमीत भोईर यांना दाखवत असल्याचा व्हिडियो समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.

Summary

पोलिसांनी शरद लोखंडे यांच्याकडे अग्नीशस्त्र बाळगण्याचा परवाना आहे का ? याची खातरजमा पोलिस ठाण्यातील अभिलेखात केली. मात्र त्यांच्या नावे अग्नीशस्त्र वापरण्याचा परवानाच नसल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये शनिवारी (दि.15) गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

उंबर्डे गावातील दत्त मंदिरासमोरच्या मैदानात दीप्ती लोखंडे यांच्या विवाहनिमित्त भव्य मंडप उभारण्यात आला होता. शुक्रवारी (दि.14) संध्याकाळी या मंडपात हळदी समारंभाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान स्टेजवर नाचत असताना चिंतामण लोखंडे यांनी कंबरेला खोचलेले रिव्हाॅल्व्हर बाहेर काढले. ते डाव्यात हातात घेत हात उंचावून मैं हू डाॅन या गाण्याच्या तालावर नाचू लागले. यावेळी चिंतामण लोखंडे यांच्या आजूबाजूला लहान बालके आणि महिलांसह वऱ्हाडी मंडळी नाचत होती. नजर चुकीने काही दुर्घटना याठिकाणी घडली असती तर त्याची जबाबदारी कुणाची होती, असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येत होते.

सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसह सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य करून स्वसंरक्षणासाठीच्या परवानग्याचे जाहीर प्रदर्शन करून शस्त्र वापर परवान्याचा नियमभंग केला म्हणून खडकपाडा पोलिस ठाण्याचे हवालदार अविनाश पांडुरंग यांनी ठाणे जिल्हा शहवासीयांना पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी जारी केलेल्या मनाई आदेशांचा भंग केल्याच्या आरोपाखाली चिंतामण लोखंडे यांच्या विरूध्द अग्नीशस्त्र अधिनियम कायद्यान्वये शनिवारी (दि.15) गुन्हा दाखल केला.

डोंबिवली, ठाणे
‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर नाचवली रिव्हॉल्व्हर, गुन्हा दाखल

हळदी समारंभात नाचत असताना शरद लोखंडे त्यांच्याकडील रिव्हाॅल्व्हर सुमित भोईर यांना दाखवत असल्याचे व्हिडियोमध्ये पोलिसांना आढळून आले. या व्हिडियोची पडताळणी करण्यात आली. रिव्हाॅल्व्हरधारक शरद लोखंडे यांच्याकडे गृह विभागाकडून दिला जाणारा अग्नीशस्त्र बाळगण्याचा परवाना आहे का ? याची खात्री करण्यात आली. शरद लोखंडे यांच्याकडे परवाना नसतानाही ते रिव्हाॅल्व्हर वापरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या गुन्ह्यातील कलम वाढविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हळदी समारंभाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी याची गंभीर दखल घेऊन खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांना शस्त्राचे जाहीर प्रदर्शन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. स्वसंरक्षणासाठीच्या शस्त्राचा अशाप्रकारे नियमबाह्य वापर होत असल्याने उपायुक्तांनी खंत व्यक्त केली होती. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी सदर अग्नीशस्त्र जप्त करण्याची तजवीज ठेवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news