Thane crime | विठ्ठलवाडीत मध्यरात्री माथेफिरूचा धुमाकूळ

दुचाक्यांच्या तोडफोडीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, कोळसेवाडी पोलिसांकडून शोध सुरू
Thane crime | विठ्ठलवाडीत मध्यरात्री माथेफिरूचा धुमाकूळ
Published on
Updated on

डोंबिवली : विठ्ठलवाडी परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका माथेफिरूने रस्त्याकडेला पार्क केलेल्या काही दुचाक्यांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले. या माथेफिरूने केलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी वाहन मालकाच्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पूर्वेकडे असलेल्या विठ्ठलवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास एका माथेफिरूने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाक्यांना लक्ष्य केले. हातात दगड घेऊन एकामागून एक दुचाक्यांच्या काचा, मीटर आणि हेडलाईट्स फोडून नुकसान केले. मोठा आवाज झाल्याने परिसरातील रहिवासी घराबाहेर पडले तेव्हा त्यांना आपल्या दुचाक्यांची मोडतोड झाल्याचे दिसून आले. रहिवाशांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक तरूण हातात दगड घेऊन दुचाक्यांवर घालताना स्पष्टपणे दिसून आला. या फुटेजच्या आधारे बादल चव्हाण (२३) नामक तरूणाच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तोडफोड आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने हे कृत्य नेमक्या कोणत्या कारणातून केले ? याचा अधिक तपास पोलिस करत आहेत. अशा प्रकारे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news