Thane Crime News | गुन्ह्यांसाठी केला तीन हजार सिमकार्डचा वापर

गुन्ह्यातील ७७९ सिमकार्ड हस्तगत: शेअर ट्रेडिंगच्या नावे गंडा घालणाऱ्या तिघांना अटक
thane
ठाणे : आंतरराष्ट्रीय टोळीतील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यानंतर आर्थिक गुन्हेशाखेच्या वतीने पत्रकार परिषदेत गुन्हात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल.pudhari news network

ठाणे : विविध मोबाईल कंपनीच्या सिमविक्री करणाऱ्या एजंटाच्या माध्यमातून दुसऱ्याच्या नावाचे सिमकार्ड घेऊन परराज्यात, विदेशात वापर करून बनावट शेअर ट्रेडिंग एप्लिकेशन साईट्सवरून आर्थिक गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा सायबर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश लाभले आहे. या कारवाईत सिमकार्डचा वापर करीत परराज्यातून आणि विदेशातून हा गोरखधंदा चालवीत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सायबर,आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.

चितळसर पोलीस ठाण्याच्या गुन्हे रजिस्टरमध्ये दाखल गुन्ह्यात अज्ञात आरोपींनी मोबाईलवर तक्रारदार यांना एक लिंक पाठवून शेअर गुंतवणुकीत चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन करीत २९ लाख ३० हजाराचा गंडा घालण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासात सिमकार्ड कांडचा पर्दाफाश झाला. आयएमईआय लोकेशन ट्रेस करून तांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून सपोनि मंगलसिंग चक्षाण, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे, पोलीस उप निरीक्षक सुभाष साळवी व सायबर सेलचे पथक पोलीस नाईक प्रविण इंगळे, राजेंद्र नेगी, गणेश इलग यांनी आरोपीतांचे गुन्हेगारी स्थळ शोधून यशस्वी छापेमारीची कारवाई केली. छापेमारीत आरोपी अफताय इरशाद देबर (२२) रा. जगदलपुर, जैन मंदिर जवळ, प्रतापगंज पाडा, मेन रोड, जिल्हा बखगर, कोतवाली, राज्य छत्तीसगड. आरोपी मनिषकुमार मोहित देशमुख (२७) रा. पुरानी बस्ती, शितला तलाव, सुफेला, कोइका, भिलाई, आर्यनगर, छत्तीसगड, आणि टोळ्यांना सिमकार्ड पुरविणारा भाईजान उर्भ हाफीज लईक अहमद (४८) रा. उत्तर पूर्व दिल्ली पाला १६ जुलै रोजी रोजी ११ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात नेले असता १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे.

फसवणुकीच्या धंद्यात वापरातील मुद्देमाल हस्तगत

न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावल्यानंतर पोलीस पथकाने चौकशीत आरोपींकडून त्यांच्या ताब्यातून डिॲक्टीव्हेट ७७९ मोबाईल सिमकार्ड, १ लॅपटॉप, २ वायफाय राऊटर, २३ मोबाईल हॅन्डसेट्स, ५० डेबिट, क्रेडिटकार्ड, २० चेकबुक, पासबुक, रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मोबाईल सिमकार्ड, बँक चेकबुक, डेबिट, क्रेडिटकार्डद्वारे संबंधीत बँक खात्यांचे विश्लेषणात्मक तपास केला. सुमारे ५ ते ६ बँक खात्यांचा गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे आणि मोठ्या स्वरुपाचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे तपासात आढळले आहे.

विविध राज्यात १४ तक्रारी

तपासात सिमकार्डमधून अनेक बँकांशी व्यवहार झाल्याचे समोर आले. तर दुसरीकडे राजस्थान, हरयाणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, केरळ इत्यादी राज्यात पोलीस ठाण्यामध्ये १४ तक्रारी दाखल असल्याचे नॅशनल सायबर क्राईम रिपोटींग पोर्टलवरील अभिलेखावर नमूद असल्याचे उपायुक्त मणेरे यांनी सांगितले.

असे मिळवायचे सिमकार्ड

गुन्ह्यात वापर केलेल्या सिमकार्ड हे रायपुर, विलासपुर आणि दिल्ली या राज्यातून वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तर विदेशात सिमकार्डचा वापर कंबोडिया, दुबई, चीन इतर परदेशात सायबर गुह्याकरिता पुरविली आहे. यापूर्वी एकुण ३००० सिमकार्ड अशा फसवुणकीच्या गुन्ह्यांमध्ये वापरली असल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती उपायुक्त मणेरे यांनी दिली.

सायबर गुन्हेगार हे दोन प्रकारे गुन्हे करतात विविध आयडिया लावून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला. तुमचे पार्सल आले, लिंक पाठविणे असे घाबरविणे आणि दुसरे नफ्याचे अमिश दाखवून फसवितात. तेव्हा नागरिकांनी अशा कुठल्याही अमिषाला बळी पडू नये, अनोळखी लिंक क्लिक करू नये, आपले ओटीपी कुणालाही शेअर करू नये असे आवाहन नागरिकांना केले आहे.

पराग मणेरे, पोलीस उपायुक्त सायबर, आर्थिक गुन्हेशाखा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news