Thane Crime News | खूनाच्या गुन्ह्यातील 6 वर्षांपासून फरार संशयित अखेर गजाआड

खून प्रकरणात नवी मुंबईतून तुळींज पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या
crime news
तरुणाच्या खून प्रकरणातील 6 वर्षांपासून फरार असलेल्या संशयितास अटक करण्यात आलीfile photo
Published on
Updated on

नालासोपारा : तरुणाच्या खून प्रकरणातील 6 वर्षांपासून फरार असलेल्या संशयितास अटक करण्यात तुळींज स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.

मोरेगावच्या मौर्या नगर येथील नागरिक कॉलनीत राहणार्‍या प्रवीण उर्फ सोनू साखरिया (22) याची 3 मे 2018 रोजी हत्या करण्यात आली होती. त्याची अज्ञात हत्याराच्या सहाय्याने डोक्यात तसेच तोंडावर मारून गंभीर जखमी करत हत्या केलेला मृतदेह 90 फुटी रोडच्या कडेला मिळाला होता. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी भरत राय (25), आशिष कुलकर्णी (21), निशांत मिश्रा ऊर्फ मोनु रायडर (29) आणि प्रिन्स सिंग ऊर्फ पोगो यांनी केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न केले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी भरत, आशिष आणि निशांत या तिघांना तत्काळ अटक केली होती. पण गुन्हा घडल्यापासून आरोपी प्रिन्स हा सहा वर्षांपासून फरार होता. त्याचा शोध घेऊन अटक करण्यासाठी वरिष्ठांनी आदेश देण्यात आले होते.

तेव्हापासून पाहिजे आरोपी हा त्याचे अस्तित्व लपवून विरार, अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई येथे वास्तव्य करत असल्याचे गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली होती. या आरोपीचा माग काढत असताना गुरुवारी (दि.15) संध्याकाळी विरार कातकरी पाडा येथे असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे यांना मिळाली होती. वरिष्ठांना माहिती देऊन सदर ठिकाणी तुळींज गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून आरोपी प्रिन्सला ताब्यात घेतले. या गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यावर आरोपीला अटक केली आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील, तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सपोउनिरी शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, राजेंद्र जाधव, अशपाक जमादार, पांडुरंग केंद्रे, इस्माईल छपरीबन, राहुल कदम, शशिकांत पोटे, बागुल, अमोल बर्डे यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news