Thane Crime News | एमडी ड्रग्ज पेडलर्स अटकेत

Thane Crime News : एक लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त
Drugs worth Rs 1 lakh seized
एक लाख रुपयांचे ड्रग्ज जप्तPudhari File Photo
Published on
Updated on

ठाणे : मुंब्रा-डायघर परिसरात एमडी ड्रग्ज विक्री करणार्‍या एका ड्रग्ज पेडलर्सला मुंब्रा पोलीस पथकाने अटक केली. इम्तियाज दाऊद मर्चंट (48, मुंब्रा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटकेतल्या आरोपीकडून 1 लाख रुपये किमतीचे 60 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंब्रा व डायघर परिसरात एक कुख्यात गुंड एमडी हे घातक ड्रग्ज विक्री करीत असल्याची माहिती मुंब्रा पोलीस पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा लावून शनिवार (दि. 27 जुलै) रोजी ड्रग्ज पेडलर्स इम्तियाज यास अटक केली. यावेळी त्याच्याकडे 60 ग्रॅम वजनाचे एमडी हे ड्रग्ज आढळून आले. पोलिसांनी हे ड्रग्ज जप्त केले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने हे ड्रग्ज विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. आरोपीने हे अमली पदार्थ कुठून आणले, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. अटकेतला ड्रग्ज पेडलर्स अट्टल गुन्हेगार असून तो 1997 साली टी सिरीज कॅसेट्स कंपनीचे मालक गुलशन कुमार यांच्या हत्याकांडातला सहआरोपी आहे. तसेच 2000 साली झालेल्या जैनउद्दीन चौगले हत्या प्रकरणात देखील तो सह आरोपी आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news