Thane Crime News | भिवंडीत सव्वाकोटीचा मुदतबाह्य खाद्य, सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त

घातक साहित्याचा पुनर्वापर करणार्‍या गोदामावर छापा; तिघांविरोधात गुन्हा दाखल
Thane Crime News | भिवंडीत सव्वाकोटीचा मुदतबाह्य खाद्य, सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त
Published on
Updated on

भिवंडी : भिवंडी तालुक्यात अनधिकृतपणे मुदतबाह्य खाद्य तसेच सौंदर्य प्रसाधनांचा पुनर्वापर करणार्‍या गोदामावर छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यादरम्यान सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोदाम मालक हा सर्व मुदतबाह्य माल कोठून आणत होता व कोणाला विक्रीसाठी देत होता, याबाबत संपूर्ण माहिती गोळा करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई लवकरच केली जाणार असून शहरात अशी मुदतबाह्य साहित्य विक्री कोठे होत असल्यास त्याची माहिती पोलीस यंत्रणेस दिल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलीस उपायुक्त, ठाणे

गोदामात घातक असलेल्या साहित्यांचा साठा करून ठेवला जात असून याबाबत भिवंडी पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर शांतीनगर पोलिसांच्या विशेष पथकाने नारपोली पालीस ठाणे हद्दीतील ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील गोदामावर छापा मारून तेथून सव्वा कोटी रुपयांचा मुदतबाह्य झालेला खाद्य व सौंदर्य प्रसाधने यांचा साठा जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news