Thane Crime News | नशेखोरांकडून कफ सिरपचा सर्रास वापर

लोहमार्ग पोलिसांकडून दोघांना अटक, 280 बॉटल्सचा साठा हस्तगत
Thane Crime News | नशेखोरांकडून कफ सिरपचा सर्रास वापर
Published on
Updated on

डोंबिवली : चरस, गांजा, अफू, अफिम, गर्द अर्थात ब्राऊन शुगर, एमडी अशा नशा आणणारे पदार्थ भूमिगत सुरू असलेल्या बाजारात चढ्या भावाने विक्री होतात. त्यामुळे नशेखोर स्वस्त नी मस्त भावात मिळणार्‍या कफ सिरप सारख्या नशा आणणार्‍या औषधांकडे वळाल्याचे पोलिसी कारवायांतून उघड झाले आहे. कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी दोघा नशेखोर वजा बदमाशांची गठडी वळल्यानंतर त्यांचा कारनामा उघडकीस आला आहे. अटक केलेल्या दोघा बदमाशांकडून पोलिसांनी कफ सिरापच्या 280 बॉटल्सचा साठा हस्तगत केला आहे.

कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथून चेन्नई एक्स्प्रेसने कल्याण जंक्शनवर उतरलेल्या दोन जणांना लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कफ सिरपच्या 280 बाटल्या जप्त करण्यात आल्या. केल्या आहेत. नवाब सिद्दीकी आणि अकील मटके अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे दोघेही भिवंडी परिसरात राहणारे आहेत.याच कफ सिरपचा वापर नशेसाठी केला जात असल्याने पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

कर्नाटकहून चेन्नई एक्स्प्रेसने नवाब सिद्दीकी आणि अकील मटके हे दोघे कल्याण रेल्वे स्थानकावर उतरले. अन्य प्रवाशांसह दोघांकडील सामानाच्या तपासणी दरम्यान त्यांच्या बॅगेत कफ सिरपच्या बाटल्यांचा साठा आढळून आला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या दोघांची झाडाझडती घेतली. चौकशी दरम्यान सुरूवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कफ सिरपचा वापर नशेसाठी केला जात असल्याचे पोलिसांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे पोलिसांनी खाक्या दाखवून चौकशी केली असता या दोन्ही बदमाशांनी गुन्ह्याची कबुली दिली. कफ सिरपचा वापर नशेसाठी करत असल्याचे सांगणार्‍या या बदमाशांची कस्सून चौकशी सुरू करण्यात आली आहे. बाटल्यांचा इतका मोठा साठा कुठून आणला ? कुणाकडून घेतला ? हा साठा स्वतःसाठी वापरला जाणार होता की कुणाला विक्री केला जाणार होता ? या सार्‍या प्रश्नांची उत्तरे लवकर मिळतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news