Thane Crime | दुधवाढीच्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचे साहित्य जप्त, एकाला अटक

कल्याणच्या गोविंदवाडीत क्राईम ब्रँचची कारवाई

Thane Crime | Lactation oxytocin injection materials seized, one arrested
दुधवाढीच्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचे साहित्य जप्त, एकाला अटकPudhari Photo
Published on
Updated on

डोंबिवली : गाई/म्हशींच्या दूध वाढीसाठी देण्यात येणार्‍या ऑक्सिटोसीन इंजेक्शनमध्ये लागणारे औषध बेकायदेशिररित्या तयार करणार्‍या एका इसमाला क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटसह अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी कल्याण पश्चिमेतील तबेले बहुल असलेल्या भागातील गोविंदवाडी परिसरातून अटक केली. या इसमाकडून 1 लाख 60 हजाराचा इंजेक्शनसाठी लागणार्‍या ऑक्सिटोसीन इंजेक्शनसाठी लागणार्‍या 1 हजार 67 औषधांच्या बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला. मसी सादीक खोत (50) असे या इसमाचे नाव असून तो मासळी बाजाराशेजारच्या फालके इमारतीत राहतो.

गाई आणि म्हशींना अधिक पान्हा येण्यासह त्या अधिक दुधाळ व्हाव्यात यासाठी ऑक्सिटोसीन इंजेक्शने दिली जातात. त्यामध्ये टाकण्यासाठी लागणारे औषध तयार करण्याचे काम बेकायदेशीरपणे एक इसम कल्याणमधील गोविंदवाडी भागात बिस्मिल्ला हॉटेल भागात करत असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांना मिळताच त्यांनी ही माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या कोकण विभागाचे औषध निरीक्षक संजय राठोड यांना दिली. क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, हवा. गुरूनाथ जरग, बालाजी शिंदे, विलास कडू, अनुप कामत, सचिन वानखेडे, उमेश जाधव यांच्यासह अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक संजय राठोड आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मंगळवारी सापळा लावला होता.

बंदिस्त खोलीत औषधांचे चोरी-छुपे उत्पादन

औषधांचे उत्पादन करत असलेल्या गोविंदवाडीमधील बिस्मिल्ला हॉटेल रस्त्यावर असलेल्या निसार मौलवी चाळीत नेले. तेथील एका बंदिस्त खोलीत आरोपी मसी हा चोरी-छुपे औषधांचे उत्पादन करत असलेल्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनच्या 1 हजार 67 बाटल्या आढळल्या. हे औषध तयार करण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य, लेबल, बाटली बंद करण्यासाठीचे साहित्य आढळले. पोलिसांनी हे सर्व 1 लाख 60 हजारांचे साहित्य जप्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news