Thane Crime : मित्रानेच रचला मित्राच्या घरी दरोड्याचा डाव

अवघ्या ४८ तासांत ३ आरोपी जेरबंद, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
Thane Crime : मित्रानेच रचला मित्राच्या घरी दरोड्याचा डाव
Published on
Updated on

नालासोपारा ( ठाणे ) :वसईतील दामुपाडा परिसरात घडलेल्या थरारक दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना गुन्हे प्रकटीकरण शाखा-कक्ष २, वसई यांनी अवघ्या ४८ तासांत गजाआड केले असून तब्बल १० लाखांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वसईत १८ नोव्हेंबर रोजी दुपारी फिर्यादी गीता राऊत यांच्या घरी तीन अनोळखी इसमांनी जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांनी फिर्यादी व त्यांचा मुलगा यांना धरून त्यांच्या गळ्यावर चाकू लावून सोन्याबद्दल चौकशी केली. फिर्यादी यांनी नकार दिल्यानंतर आरोपोंपैकी एकाने त्यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बार चुकला तरी त्यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर आरोपीनी कपाटातील १२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल असा ऐवज घेऊन पसार झाले. या घटनेनंतर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

चित्रसेनची संपत्ती पाहून त्याची नियत फिरली

फिर्यादी यांचा नवरा चित्रसेन राऊत यांचा मित्र काळू प्रभाकर साहू हा त्यांच्या घरी येत जात असे त्याने चित्रसेनची संपत्ती पाहून त्याची नियत फिरली त्याने मित्राच्या घरी दरोडा घालण्याचा प्लान आखला. साह याने अशोक उर्फ बाबू राजू शिंदे या गुन्हेगाराला हाताशी धरून बिगारीचे काम करणारे कामगार यांना पैशाचा आमिष दाखवून नुर हसन खान, सुरज किशोर जाधव यांनी मिळून घराची रेकी केली. प्लान आखल्यानंतर काळू याने दरोडा घालताना घराच्या आसपास कुठेच न फिरता आरोपी दरोडा घालून पळाल्यानंतर फिर्यादीच्या घरी आला आणि तिच्यासोबत तक्रार देण्यासाठी वाली पोलीस ठाण्यात त्यांचं सांत्वन करण्याचा खोटं नाटक करून पोलीस काय करतात याचा मागोवा घेत राहिला.

तपासाची सुरुवात आणि द्विस्ट

गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली. तपासात धक्कादायक माहिती मिळाली. आरोपी कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात पळून गेले होते. तत्काळ विशेष पथक तयार करून तेथून आरोपी अशोक उर्फ बाबू राजू शिंदे, अब्दुल रऊफ हाशमी, रितीक रची बेलंगी यांना पकडण्यात यश मिळाले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून ८ तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण १०,००,००० किमतीचा ऐवज ताब्यात घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news