Crime News: एमडी ड्रग्जची विक्री करणारा अटकेत; तीन कोटींचे ड्रग्ज जप्त

ठाण्यातील वाढत्या अमली पदार्थ विक्री विरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

ठाणे: एमडी ड्रग्जची तस्करी व विक्री करणाऱ्यास ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने शीळ-डायघर परिसरातून २६ जुलै रोजी सलमान मुन्ना शेख (३०, मुंब्रा) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून ३ कोटी ४ लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

ठाण्यातील वाढत्या अमली पदार्थ विक्री विरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे.

Crime News
Unsafe Buildings Bhiwandi: भिवंडीत विद्युतदृष्ट्या असुरक्षित २६६ इमारतींना बजावल्या नोटिसा

गुन्हे शाखा, युनिट एकचे पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांना एक जण ड्रग्ज विक्रीसाठी डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे २६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास कल्याण फाटा येथील हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर सापळा रचण्यात आला.

यावेळी ऑटोरिक्षातून आलेल्या सलमान याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत व्यापारी प्रमाणातील १ किलो ५२० ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज आढळून आले. या अमली पदार्थाची किंमत ३ कोटी ४ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Crime News
Kalyan Shil Road Traffic Jam: कल्याण-शिळ मार्गावर वाहतूक नियोजनाचा पुन्हा फज्जा

तर अमली पदार्थाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ऑटोरिक्षा, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीने हा अमली पदार्थ नेमका कोणाकडून आणला व तो कोणाला विकला जाणार होता याचा तपास गुन्हे शाखेचे पथक करीत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news