ठाणे : वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाने लाच मागितल्याप्रकरणी पोलीस नाईकवर गुन्हा

crime
crime
Published on
Updated on

डोंबिवली: पुढारी वृत्तसेवा: मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील प्रकरणात आपल्या वरिष्ठांनी सहकार्य केले आहे. आणि ते यापुढे ते करतील. त्यासाठी 50 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करणाऱ्या एका पोलीस नाईक पदावरील कर्मचाऱ्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन राठोड असे या पोलिसाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाईक पदावर कार्यरत असलेला नितीन राठोड हा पोलीस उपनिरीक्षक मुसळे यांचा लेखनिक आहे. पोलीस उपनिरीक्षक मुसळे यांच्याकडे एक गुन्हा तपासासाठी आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला आणि त्याच्या पत्नीला पोलीस उपनिरीक्षक मुसळे यांनी सहकार्य केले आहे आणि ते यापुढेही सहकार्य करतील, असे नितीन राठोड याने या प्रकरणातील आरोपीला सांगितले. मात्र, त्यासाठी साहेबांना 50 हजार रुपये द्यावे लागतील, असेही त्याने सांगितले.

दरम्यान, या पैशांसाठी राठोड यांनी आरोपीकडे तगादा लावला होता. त्यामुळे आरोपीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक शहानिशा केली. चौकशीदरम्यान राठोड याने आरोपीकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. आरोपी आणि पोलीस नाईक राठोड यांच्यात झालेले झालेल्या तडजोडी अंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले. तपासादरम्यान 40 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news