

ठाणे : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारपट्टी पर्यटन प्रकल्पांमुळे अधिक आकर्षणाचा विषय ठरत आहे. वाढते पर्यटन ही दिलासा देणारी गोष्ट असली तरी यामध्ये कांदळवनांचे संरक्षण हाही तेवढाच महत्त्वाचा विषय आहे. कांदळवनांमुळे सागरी किनार्यांचे सौंदर्य अबाधित तर राहतेच, त्याचबरोबर सागरी धूप थांबवण्यासही मोठी मदत होते. तिसरा फायदा मत्स्य संवर्धनासाठी कांदळवने महत्त्वाची भूमिका बजावतात. जेवणामध्ये मिठाची जेवढी गरज असते, तेवढीच किनारपट्टीला कांदळवनांची गरज आहे.
कोकणातील खाड्या आणि नदीमुखानजिक असलेली कांदळवने म्हणजेच पाणथळ वनस्पती या येथील जैवविविधतेच्या प्रमुख आकर्षणाच्या गोष्टी आहेत. अनेक जातीच्या माशांचे पालनपोषण याच कांदळवनात होते. कांदळवनांच्या या सोबतीमुळे अनेक समुद्री माशांच्या पिल्लांचे संवर्धन होत असल्याने निसर्गचक्रातील एक महत्त्वाचा घटक म्हणून कांदळवनांकडे पाहिले जाते. अनेक भागात कांदळवन संवर्धनासाठी स्थानिक माणसांनी पुढाकारही घेतला आहे. खाडी किनार्याच्या अनेक मत्स्यजाती आज नष्ट होऊ लागल्या आहेत. याचे मुख्य कारण कांदळवनांचा होणारा र्हास आहे. या किनार्यांवर माणसांचे होणारे अतिक्रमण हे निसर्ग चक्राला छेद देवू लागले आहे. कोकणच्या किनारपट्टीवर निर्माण होत असलेली बंगले संस्कृती या र्हासाचे कारण ठरत आहे. याला पायबंद घालणे आता अनिवार्य ठरले आहे. सीआरझेडची मर्यादा कमी केल्यामुळे अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लोकांनी मनमानी पद्धतीने कांदळवनांची कत्तल सुरू ठेवली आहे. त्यामुळे पाणथळ वनस्पतींचे संवर्धन काळाची गरज बनली आहे.
मुळात कांदळवन, तिवरं आणि मॅनग्रुव्हज्चे रक्षण करण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. पण त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता कुणाला वाटत नाही. कोकणातल्या रेवस, अलिबाग, नागाव, चौल आणि दिघी येथे मॅनग्रुव्हज्ची स्थिती वाईट आहे. दिवे आगर, वेळास, केळशी, उटंबरे, आडे, गणेशगुळे, रनपार, पूर्णगड, गावखेडी, वेत्ये, मोचेमाड, आरवली टाक येथील स्थिती बिकट आहे. आंजर्ले, गुहागर, भाट्ये, केळूस येथे मॅनग्रुव्हज् विरळ आहेत. आचरा आणि देवगडची स्थिती थोडी बरी आहे. मालवण, फणसेवाडीत ती वाईट आहे. मॅनग्रुव्हजचे महत्त्व अनेकांना ठाऊक नाही. मॅनग्रुव्हज अनेक अर्थाने उपयुक्त असतात. खार्या पाण्यात वाढणारी ही झाडे आठ ते बारा मीटरपर्यंत, क्वचित त्याहून मोठी असतात. भूपृष्ठावरील आणि सागरी पर्यावरण निगडीत ठेवणारी ती साखळी आहे. नदीमुखाजवळ, खाडीत आणि खार्या पाण्यात वाढणारे मॅनग्रुव्हज विकसित होण्यासाठी भरपूर पाऊस, दमट हवामान आणि चिखल-दलदल लागते मॅनग्रुव्हजमुळे बांबू, इंधनासाठी लाकूड मिळते. तथापि, त्यातील काही प्रजाती औषधी म्हणून उपयुक्त मानल्या जातात. स्थानिक रहिवाशांनी त्याची माहिती करून त्यांचा वापर केला आहे. त्यांच्यामुळे ‘इकोसिस्टिम’ला मोठा फायदा होतो. दाभोळजवळील वशिष्ठी नदीमुखाजवळ दहा-बारा वर्शांपूर्वी उत्तम स्थितीतील मॅनग्रुव्हज होते.
भाटी, साखरे, पेवे या गावाजवळ त्यांचे अस्तित्व होते. परंतू रत्नागिरी पॉवर कंपनीचा उर्जा प्रकल्प तिथे आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कटाई करण्यात आली. जमिनीचा वापर बांधकाम आणि इमारतीसाठी केल्याने अतिशय वाईट पद्धतीने मॅनग्रुव्हज कापून टाकण्यात आले. त्याबद्दल कोणत्याही खात्याला, सरकारी पातळीवर, वनविभाग किंवा स्थानिक रहिवाषांनी खंत व्यक्त केली नाही. काळजी घेतलेली नाही. जमिनीतील खारेपणा शोषून घेणारी मॅनग्रुव्हज खार जमिनींना उपयुक्त ठरतात. उमरोली गावाजवळ सावित्री नदीच्या प्रवाहालगत असणार्या मॅनग्रुव्हजची कत्तल झाली आहे. या भागात आंब्याची लागवडही आढळते. शेतजमिनीसाठी किंवा फळबाग वाढवण्यासाठी मॅनग्रुव्हज कापून टाकण्याचा प्रकार केला जातो. पांगरी, पेवे, इसापूर, भोपण, चिवलीत असलेल्या मॅनग्रुव्हजकडे लक्ष न दिल्याने ते नष्टप्राय होत आहेत. समुद्राचे उधाण थोपवण्यासाठी मॅनग्रुव्हज उपयोगी ठरतात. म्हसळा आणि श्रीवर्धनची खाडी, कुंडलिका, सावित्री, वशिष्ठी नद्यांच्या परिसरातील मॅनग्रुव्हजना धोका आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारे दिवसेंदिवस कमकुवत होत आहेत. रेवस सोबतच अलिबाग, नागाव, चौल आणि दिघी समुद्रकिनारी खारफुटीची झाडे आहेत. दिवेआगर, वेळास, केळशी, उतांबरे, आडे, गणेशगुळे, रानपार, पूर्णगड, गावखेडी, वेट्ये, मोचेमाड, आरवली, टाक या गावांची अवस्था बिकट आहे.मालवणमध्ये आणि फणसेवाडी ही निकृष्ट व विरळ आहे. रेवस, अलिबागच्या काही भागात खारफुटीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी, लांबी आणि रुंदी, घनता आणि खारफुटीची उंची कमी झालेली आढळते. याचे महत्त्व सामान्य माणसाला माहिती नसते इको-सिस्टममधील खारफुटी. खारफुटी खारट पाण्यात, दलदलीच्या प्रदेशात वाढतात. मुहाने आणि खाडीच्या जमिनी. त्यांच्या निरोगी वाढीसाठी आर्द्र हवामान आणि जोरदार पावसाची गरज आहे. खारफुटी हे इको सिस्टीमचे महत्त्वाचे घटक आहेत. अगदी दहा वर्षांपूर्वी दाभोळ खाडी हे सर्वात श्रीमंत केंद्र होते खारफुटी भाटी, साखरे, पेवे यांच्याजवळ त्याचे अस्तित्व विपुल होते. पण देय रत्नागिरी वीज प्रकल्पाची टक्केवारी लक्षणीयरीत्या कमी झाली. खारफुटीचे तुकडे करून बांधकामासाठी वापरण्यात आले. वन आणि विविध संबंधित विभाग जैव संवर्धनासाठी खारफुटीचे जतन करण्यासाठी सरकारने पुढे यावे असे जाणकारांचे मत आहे.