TMC election : प्रारूप प्रभाग रचनेच्या सुनावणीत विरोधाचा सूर

सत्ताधाऱ्यांच्या सोयीची नगरसेवक चोरी करणारी प्रभाग रचना, विरोधकांचा सुनावणीमध्ये आक्षेप...
TMC election
TMC election : प्रारूप प्रभाग रचनेच्या सुनावणीत विरोधाचा सूरpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान प्रभाग रचनेला विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात आला. ही प्रारूप प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांच्या सीपीची तसेच नगरसेवक चोरी करणारी प्रभाग रचना असल्याचा आक्षेप यावेळी मनसे, कनाठा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादे काँग्रेसच्या नेत्यांकडून पेण्यात आला. सुनावणीसाठी आणखी पाच दिवसांची वेळ बाहवून देण्याची मागणी यावेळी विरोधकांकडून करण्यात आली. या प्रभाग स्वनेवर एकूण २७० हरकती ठागे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे प्रात झाल्या होत्या.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना तयार करण्यात आली असून या प्रभाग रचनेवर बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेण्यात आली. प्राधिकृत अधिकारी राज्याचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी यांच्या उपस्थितीत ही सुनावणी घेण्यात आली.

यावेळी माजी खासदार राजन विचारे, आमदार जितेंद्र आव्हाड, मनसे नेते अविनाश जाधव, ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण या सर्वानीच उपस्थित राहून पालिकेच्या प्राख्य प्रभाग रचनेवर आक्षेप घेतले आहेत. आ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचनेविरोधात आक्षेप नोंदवत गंभीर आरोप केले. प्रभाग रचना २०११ सालच्या जनगणनेच्या आधारावर केली जात असल्याचे जाहीर केले आहे. प्रभाग रचनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये प्रभागाची लोकसंख्या दर्शविण्यात आली. मात्र, ममुद्यामध्ये प्रगणक गट यांचे नकाशे आणि प्रती प्रगणक गट लोकसंख्या, त्यातील अनुसुचित जाती व जमातींची लोकसंख्या ही मूलभूत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही.

TMC election
Kapil Sharma Show: बॉम्बे नव्हे मुंबई उल्लेख करा, अमेय खोपकरांचा कपिल शर्माला विनंती वजा इशारा

यामुळे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या मसुद्यांमधील लोकसंख्येचा कोणताही पडताळा घेता आला नाही. महानगरपालिकेच्या अधिका-यांकडे विचारणा करूनही सदर माहिती प्राप्त झाली नाही, असा आक्षेप आव्हाड यांनी नोंदवला एकूण नगरसेवक पद संख्येनुसार प्रती नगरसेवक लोकसंख्या ठरविली जाते. सामान्यतः चार नगरसेवकांचा एक प्रभाग व आवश्यकता भासल्यास तीन किंवा पाच नगरसेवकांचा एक प्रभाग अशी प्रभाग रचना करणे अपेक्षित आहे. प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या ठरवताना सरासरी लोकसंख्येच्या १०८टक्के जास्त किंवा १०८टक्के कमी इतकी लोकसंख्या कमी जास्त करता येते.

ठाणे महानगरपालिकेची प्रती ४ सदस्य प्रभाग सरासरी लोकसंख्या ५६,२२८ आणि प्रती तीन सदस्य सरासरी लोकसंख्या ४२.१७१ इतकी आहे. १० टक्के जास्त व १०टके कमी असा एकूण २० टक्के लोकसंख्या फरकाचा गैर फायदा घेऊन ठाणे शहर क्षेत्र व दिवा क्षेत्र येथे कमी लोकसंख्येचे प्रभाग बनविण्यात आले आणि कळवा मुंब्रा क्षेत्रात जास्त लोकसंख्येचे प्रभाग बनविण्यात आले आहे याप्रकारे कळवा, मुंद्रा क्षेत्रात सदस्यांचा पूर्ण एक प्रभाग चोरण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रभाग रचना ही अधिका-यांनी हॉटेलमध्ये बसून केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. कोलशेतमध्ये वरचा गाय खालचा गाच वेगळा केला गेला आहे, कोळीवाडा, कोकणीपाडा, वृंदावन तलावपाळीला आणि तलावपाळी खोपटला जोडण्यात आला आहे. आदींसह इतर भागांचे देखील अशाच पद्धतीने तुकडे करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या तक्रारी कोणत्या प्रभाग समितीत जाऊन सोडवाव्यात, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. २०१७ प्रमाणे प्रभाग रचना असेल, असा दावा केला होता. परंतु हद्द आणि सीमा बदलण्यात आल्या असून वॉर्ड देखील फोडण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला,

दिशा नाही, हद्द नाही

महापालिकेने सादर केलेल्या प्रभाग रचनेच्या नकलांमध्ये सर दिसत नाही, सिमा सुकविण्यात आल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने वॉर्ड फोडले गेले आहेत, सोयीचे वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. असा आरोप यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी उपस्थित केला.

विरोधक आत, सत्ताधारी बाहेर

नरेंद्र बल्लाळ सभागृहात सुनावणी सुरू असताना ज्यांना वेळ देण्यात आला होता, ते सभागृहाच्या बाहेर होते, त्यात सत्ताधारी भाजपचे काही मंडळी देखील बाहेर उभे होते. मात्र विरोचक चेट सभागृहात गेल्याने सत्ताधारी भाजपने आक्षेप घेत आमही तासन्‌तास येथे थांबलो असतांना व्हीआयपींची आधी सुनावणी कशी, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यामुळे काही वेळ याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संपूर्ण शहराचीच वाट लावली

केवळ एका प्रभागाची नव्हे तर संपूर्ण शहराचीच वाट लावली आहे, असा आरोप करत एका प्रभागाचा विचार करू नका, प्रभागातून बाहेर पडा आणि संपूर्ण शहराचा विचार करा, असे आवाहन मनसेचे अविनाश जाधव यांनी यावेळी उपस्थितांना केले. प्रारूप रचना गणपतीपूर्वी प्रसिद्ध केली आणि सुनावणी गणपतीनंतर ठेवली. त्यामुळे आम्हाला नीट अभ्यास करण्यासाठी वेळच मिळाला नाही. पुढील तारखेला पुन्हा सुनाठणी घ्यावी, आम्हाला योग्य संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news