देव तारी त्याला कोण मारी.. तिसऱ्या मजल्यावरून पडूनही चिमुकला सुखरूप

thane Crme : डोंबिवलीतील देवीचापाडा येथील घटना
thane Crme News
तिसऱ्या मजल्यावरून पडूनही चिमुकला सुखरूप बचावला.
Published on
Updated on

कल्याण : डोंबिवलीतील तेरा मजली इमारतीमधील तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून दोन वर्षाचा चिमुरडा खाली पडत असल्याचे एका तरूणाच्या निदर्शनास आले. तरूणाने धावत जाऊन त्याला झेलण्याचा प्रयत्न असता चिमुकला हातातून निसटून जमिनीवर आदळला. या अपघातात पायावर पडल्याने चिमुकला किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि.२५) दुपारी पावणेदोनच्या सुमारास डोंबिवलीतील देवीचापाडा येथे घडली.

डोंबिवली पश्चिमेकडील देवीचापाडा येथील गावदेवी मंदिरजवळ एक तेरा मजली इमारत आहे. या इमारतीजवळ भावेश एकनाथ म्हात्रे हा तरुण शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास त्याच्या सहकाऱ्यांसोबत बोलत थांबला होता. यादरम्यान दोन वर्षाचा चिमूरडा खेळता खेळता तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली पडत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. तरूणाने तातडीने धाव घेत त्या चिमुकल्याला झेलण्याचा प्रयत्न केला मात्र चिमुकला हातातून निसटून खाली पडला. या दुर्घटनेत चिमुकल्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून नशीब बलवत्तर म्हणून तो सुखरूप बचावला. सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना चित्रीत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news