ठाणे : मुले चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

KALYAN CRIME : सहा आरोपी अटकेत; कासा पोलिसांची कामगिरी
Child stealing gang busted
मुले चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाशPudhari Photo
Published on
Updated on

कासा : कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुक्रवारी (दि.4) रात्री चारोटी उड्डाणपुलाखाली मुले चोरणाऱ्या टोळीस कासा पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी कल्याण येथून दोन मुले चोरल्याचे मान्य केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विनोद गोसावी, आकाश गोसावी, अंजली गोसावी, चंदा गोसावी, जयश्री गोसावी, आणि राहुल गोसावी असून ते सांगली जिल्ह्याचे रहिवासी आहेत.

या आरोपीने सुरज कुमार मिश्रा (८ वर्षे) आणि सत्यम कुमार मिश्रा (५ वर्षे) यांना कल्याण येथून फसवून आणण्यात आलं होते. सविस्तर माहिती अशी की, सध्या नवरात्री उत्सव सुरू असून रात्रीच्या वेळी कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे आपल्या कर्मचाऱ्यांसह गस्त घालत असताना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाण पुलाखाली काही महिला पुरुष हे वाद विवाद करत होते, त्यांचे भांडण सोडवण्यासाठी व विचारपूस करण्यासाठी कासा पोलिस गेले. भांडण करणाऱ्यांमध्ये दोन लहान मुले होती, त्यांची पोलिसांनी विचार- पूस केली असता, ती कल्याण मधील असल्याचे त्यांनी सांगत आम्हाला सदर च्या माणसांनी फसवून येथे आणल्याची माहिती त्या मुलांनी पोलिसांना दिली. अधिक माहिती घेण्यासाठी कासा पोलिसांनी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात संपर्क केला असता येथे हरवलेली मुलं म्हणून त्यांची नोंद होती अशी माहिती मिळाल्यावर संबंधित मुले चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

कासा पोलिसांचे कौतुक

कासा पोलीस ठाणे हे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग असून चारोटी, कासा, महालक्ष्मी मंदिर परिसरात येथे उड्डाण पुल, तसेच रस्त्याच्या कडेला अनेक परप्रांतीय, तसेच कचरा गोळा करणे, भंगार जमवणे आदी कामांच्या नावाने असंख्य नागरिक त्यांची ओळख नसताना राहत आहेत. त्यामुळे या भागात अश्या अनोळखी नागरिकांकडून अनेकवेळा गुन्हे घडत असून पोलिसांना आव्हान देत असतात. असातच कासा पोलिसांनी शुक्रवारी मिरज, सांगली मधील अनोळखी नागरिकांनी चारोटी येथे कल्याण हुन दोन मुले चोरून आणली होती त्या टोळीचा पर्दाफाश केला. ही कामगिरी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे टीमने केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news