Thane Bribe News | पालघरचा उपजिल्हाधिकारी 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ

संजीव जाधवरला एनसीबीने रंगेहात पकडले
उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर
उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर file photo
Published on
Updated on

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर याला 50 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला लाचखोरीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. अशाच एका प्रकरणात आदिवासी खातेदार जमीन विक्री प्रकरणात तक्रारदाराकडून जाधवर याने ही लाच स्वीकारली आहे. लाचेच्या हप्त्यापैकी 50,000 रुपयांचा हप्ता जाधवर याने तक्रारदाराकडून स्वीकारला. यावेळी सापळा रचलेल्या अँटी करप्शन पथकाने त्याला रंगेहात पकडल्याची माहिती पालघरच्या अँटी करप्शन विभागाने दिली आहे. सापळा रचून अँटी करप्शन विभागाने त्याला रंगेहाथ पकडल्यानंतर पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू होती.

उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर
Thane News | दहा अधिपरिचारिकांच्या नियुक्तीचा घोटाळा

संजीव जाधवर याच्याकडे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी असून वन हक्क समितीचेही तो सदस्य आहेत. काही दिवसांपूर्वी त्याची बदली झाली होती. मात्र त्याने जिल्हाधिकारी कार्यालयातच राहण्यासाठी मुदत वाढीचा अर्ज सादर केला आहे. त्यातच लाच मागितल्या प्रकरणी त्याला अटक झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news