ठाणे : जन्मदात्या पित्यानेच विष पाजून घेतला चिमुकलीचा जीव

मोखाडा पोलीस ठाण्यात बापाविरोधात गुन्हा दाखल
arrest
क्राईम न्यूजFile Photo
Published on
Updated on

पालघर: व्यसनाच्या आहारी गेलेल्या पित्याने आपल्या तीन वर्षाच्या पोटच्या मुलीचा जीव घेतल्याची घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. या चिमुकलीला विष पाजून तिला या बापाने मारून टाकले आहे. ही घटना मोखाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडली आहे.

आदिनाथ राजाराम रोकडे (34 वर्षे, रा. खोडाळा) असे नराधम बापाचे नाव असून परी या आपल्या लहान मुलीसह आदिनाथ व त्याची पत्नी दिपाली हे राहत होते. आदिनाथ हा नेहमी आपली पत्नी दिपाली हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण व शिवीगाळ करत असे. या जाचाला कंटाळून दिपाली नाशिक येथील आपल्या माहेरी निघून गेली. माहेरी गेल्यानंतर आदिनाथ तेथे पोहोचला व त्याने मुलीचे काही बरे वाईट करीन अशी धमकी दिपालीला दिली. तुला मुली शिवाय तडफड होईल मुलगी तुला बघायला मिळणार नाही अशी धमकी देऊन मुलीला स्वतःसोबत घेऊन निघाला. या मुलीला नराधम आदिनाथने विषारी औषध पाजले व स्वतःही विषारी औषध पिले. या प्रकारानंतर दोघेही ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे नेण्यात आले. मात्र मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना चिमुकली परी हिचा मृत्यू झाला.

यामुळे या प्रकारानंतर दिपाली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नराधम बाप आदिनाथ रोकडे याच्याविरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात मुलीला ठार मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी हा सर्व प्रकार घडला आहे. बापाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news