Bhiwandi Crime | भिवंडीत पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तरुणाचा खून; आरोपीला १२ तासांत ठोकल्या बेड्या

निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोणी ग्रामपंचायत येथील घटनेने खळबळ
Crime
CrimePudhari
Published on: 
Updated on: 

Bhiwandi Youth Killed

भिवंडी : भिवंडीतील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोणी ग्रामपंचायत येथे खुनाच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या बारा तासांत उलगडा केला आहे. विवाहित महिलेच्या संपर्कावरून झालेल्या वादातून एका 39 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी 48 वर्षीय संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, निजामपूर पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली आहे.

भिवंडीतील पावर कंपाऊंड परिसरातील आसरा हॉटेलजवळ एका व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती 15 ऑक्टोबर रोजी रात्री निजामपूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली, तर दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचेही निदर्शनास आले.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी राजेशकुमार श्यामलाल पटेल (वय 48) याचा शोध घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मण कमाजी चरपोट, वय 39 वर्षे, असे आहे. आरोपीच्या पत्नीशी मृत व्यक्तीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून वाद निर्माण झाला होता. याच रागातून आरोपीने लक्ष्मण चरपोट यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे.या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपीला अटक केली असून, गुन्ह्याच्या पुढील तपासाला वेग आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news