

पुढारी ऑनलाईन डेस्क
ठाणे येथे सुरु असलेल्या धिरेंद्र शास्त्री महाराज ऊर्फ बागेश्वर महाराज यांच्या सत्संग सोहळयादरम्यान चेंगाचेंगरी झाली असल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे येथे हा कार्यक्रम सुरु होता. मानकोली नाका याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी स्टेजवळ खूपच गर्दी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली.
भक्तांना विभूती घेण्यासाठी सर्वप्रथम महिलांना, त्यानंतर पुरुषांना एका रांगेत येण्याचे आवाहन केले. मात्र भक्तांनी एकच गर्दी केल्याने काही वेळातच गर्दीचा ताण वाढत गेला आणि व्यासपीठावर चढण्यासाठी सर्वांनीच गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली यामध्ये व्यासपीठा वरील शिडीची रेलिंग तुटली. त्यामुळे काही महिला खाली पडल्याने गोंधळ उडाला.