ठाणे : विवाहितेचा गळा आवळून मारण्याचा प्रयत्न

पतीसह दोघांविरोधात गुन्हा दाखल
क्राईम न्यूज
पत्नीस मारहाण करीत गळा आवळून मारण्याचा प्रयत्नPudhari File photo
Published on
Updated on

भिवंडी : कांदिवली मुंबई येथे राहणार्‍या एका विवाहितेचा घर घेण्यासाठी माहेरहून पैसे व सोने आणले नसल्याच्या रागातून पत्नीस मारहाण करीत गळा आवळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटने प्रकरणी पोलीस स्थानकात पती व जाऊबाई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारकोप कांदिवली परिसरात घडलेल्या घटनेत विवाहिता ही पती सर्वेश व जाऊबाई आकांक्षा यांच्यासोबत राहत असताना 5 सप्टेंबर रोजी पती सर्वेश यांचे घर घेण्यासाठी पत्नीकडे वडिलांकडून पैसे व सोन्याचे दागिने घेवून यावेत या कारणावरून भांडण झाले.

यावेळी पतीने पत्नीस हाताच्या चापटीने व लाथाबुक्याने मारहाण करून व गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. तर जाऊबाईने शिवीगाळी करून शारीरिक व मानसिक छळ केला. या मारहाणीनंतर पीडित विवाहिता ही काल्हेर येथील हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल झाली असताना तिने याबाबत नारपोली पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती सर्वेश व जाऊबाई आकांक्षा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये वर्ग केला आहे.

स्त्रियांवरील छळ थांबणार केव्हा?

विवाहितेने घर घेण्यासाठी सोन्याचे दागिने आणि पैसे न आणल्याच्या कारणास्तव सासरच्या माणसांनी विवाहितेचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा केलेला प्रयत्न पाहता समाजात स्त्रियांचे छळ होण्याचे असे प्रकार वाढतच आहेत. स्त्रियांवरील छळ थांबणार केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news