ठाणे : कलाकारांनी आपला मान टिकवला पाहिजे - विजय गोखले

गंधार गौरव पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांचा सन्मान
Thane
गंधार संस्थेच्या वतीने देण्यात येणार्‍या गंधार गौरव पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते सन्मनित करण्यात आले. Pudhari News Network
Published on
Updated on

ठाणे : 10 वर्षांपूर्वीही हिंदी मालिका-चित्रपटसृष्टीत व्यावसायिक वातावरण होते, तिथे स्वतःला सिध्द करणे जड जात होते, आता मराठी कलाकारांना हिंदी मालिका - चित्रपटसृष्टीत मान, इज्जत आहे, तो मराठी कलाकारांनी टिकवला पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी व्यक्त केले. गंधार संस्थेच्या वतीने देण्यात येणार्‍या गंधार गौरव पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते सन्मनित करण्यात आले. यानिमित्ताने प्रसिध्द अभिनेते व निवेदक विघ्नेश जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, प्रसिध्द दिग्दर्शक विजू माने, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के- सामंत, गजानन महाराज मंदिराचे विनय जोशी, अभिनेते नयन जोशी, प्रकाश निमकर, सचिन मोरे, अभिनेते आशुतोष गोखले, राजेश भोसले, मकरंद पाध्ये, राजेश उके, महेश सुभेदार पाहुणे म्हणून उपस्थितीत होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ अध्यक्षस्थानी होते. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शुक्रवारी (दि.15) गंधार गौरव सोहळा पार पडला.

यावेळी राजदत्त म्हणाले की, कला ही अपूर्ण असते ती कधी पूर्णत्वाला जाईल हे कोणीच सांगू शकत नाही. कोणत्याच कलावंताने आपल्या पाठीवरती आपणहून शाबासकी देऊ नये. उत्कृष्ट कलाकाराचे स्वतःचे समाधान होत नाही, केले आहे त्यापेक्षा अधिक चांगलं करता आले असते यातूनच कलावंत मोठा होत जातो आणि तेच होत राहणेही कलेची आणि कलावंतांची गरज असल्याचा स्वानुभव त्यांनी सांगितला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे म्हणाले रंगभूमीसाठी काम करतांना कलाकार समाजासाठी जगत असतात आत्ताच्या पिढीला इतिहास समजून सांगण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मोठी माणसे स्वतःची टिमकी वाजवत नाहीत

माझे वडील विद्याधर गोखले यांच्यामुळे आमच्या घरात मी हिमालयासारख्या उत्तुंग व्यक्तीमत्वाची माणसे पाहिली, त्यांच्यासमोर आपण वाळूचे डोंगरही नाही आहोत, या मोठ्या माणसांना मी कधीच स्वतःबद्दल सांगतांना पाहिले नाही. खरी मोठी माणसं श्रेयवादाची लढाई लढत बसत नाहीत असे ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले म्हणाले. वडिलांनी दिलेला आत्मविश्वास, प्रामाणिकपणे आणि मनापासून काम करण्याचा संस्कार केल्याचे गोखले यांनी नमूद केले.

या कलाकारांचाही झाला गौरव

बालनाट्य संस्था पुरस्कार यावर्षी न्यू नटराज थिएटर पुणे (संस्था प्रमुख दिलीप नाईक) या संस्थेला देण्यात आला. अंशुमन विचारे, जान्हवी किल्लेकर, गौरव मोरे यांना युवा पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष ज्युरी पुरस्कार मानव्य संस्था आणि प्रेरणा थिएटर आणि अंतरंग: आशिष पवार (नेपथ्य), श्याम चव्हाण आणि सुधीर फडतरे (प्रकाशयोजना), दीपक कुंभार (रंगभूषा), मयुरी माकूडे (वेशभूषा), अहना दिंडोरकर (पार्श्वसंगीत), शलाका कुलकर्णी (लेखक), रश्मी घुले (दिग्दर्शक), श्रीजय देशपांडे, अरण्या जगताप(बालकलाकार), सर्वोत्कृष्ट बालनाट्य: आदिम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news