Thane | कल्याण रेल्वे स्थानकात रिक्षाचालकांचीच मनमानी

रिक्षाचालकांच्या अरेरावीमुळे स्टेशन परिसरात वाहतूककोंडी
Thane | कल्याण रेल्वे स्थानकात रिक्षाचालकांचीच मनमानी
Published on
Updated on

सापाड : कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालकांच्या मनमानी कारभारामुळे होत असलेली वाहतुककोंडीचा फटका सर्वसाधारण नागरिकांना सोसावा लागत आहे. या वाहतुककोंडीतून कल्याण रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Summary

रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावरही आडव्या तिडव्या रिक्षा उभ्या करून अनधिकृतपणे भाडे भरणार्‍या रिक्षा चालकांमुळे कल्याणकर नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी अशा रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे रिक्षाचालकांची मनमानी वाढत चालली असल्याच्या चर्चा प्रवाशांमधून सुरू आहेत. परिणामी स्टेशन परिसरातील कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली पाहिजे.

कल्याण स्टेशन परिसरात सध्या स्माटसिटी अंतर्गत विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे स्टेशन परिसरातील रस्ते अरुंद होत चालले आहेत. त्यातच वाहतुक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे स्टेशन परिसरात रिक्षाचालकांची आडमुठेपणा सुरू असल्यामुळे कल्याण स्टेशवर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी होत आहे. कल्याण शहराला जखडलेल्या वाहतुककोंडीचे संकट कधी दूर होणार या भावनेने व्याकुळ झालेले प्रवासी वर्षानुवर्षे आपला जीव मुठीत ठेऊन वाहतुककोंडीचा सामना करत आहेत. तब्बल तीन वर्षानंतर पत्रीपुलावरील वाहतुककोंडी सुरळीत झाली आहे. तर शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही प्रवाशांना वाहतुककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालकांच्या अरेरावी मुळे दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाहतुककोंडीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. परिणामी स्टेशन परिसरातील वाहतुककोंडीतून वाट काढत प्रवाशांना स्टेशन गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे कल्याण रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेश द्वारावरून स्टेशन गाठण्यासाठी प्रवाशांना रिक्षा चालकांच्या अरेरावी सहन करावा लागत आहे. रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावर अनधिकृत रिक्षा उभ्या करून प्रवाशी भरणार्‍या रिक्षा चालकांमुळे रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी आणि स्टेशनवरून बाहेर येण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच परिवारासोबत स्टेशन गाठणं म्हणजे जिकरीचेच होऊन बसले आहे.

रिक्षा चालकांच्या अरेरावीमुळे रस्ते अडऊन बसणार्‍या रिक्षा चालकांवर प्रवाशंकडून नाराजगीचा सूर उगारला जातोय. आशा बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. यामुळे बहुतेक वेळेस प्रवाशी आणि रिक्षा चालकांमध्ये बाचाबाची होतांना दिसून येते. काही वेळेस उन्मत्त रिक्षाचालकांकडून प्रवाशांवर हात उगरण्याच्या घटनाही स्टेशन परिसरात वाढू लागल्या आहेत. अशा बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्तीचे धडे देण्याचे काम पोलीस प्रशासन करेल का? याकडे हजारों प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

कल्याण स्टेशन परिसरात सध्या सुरू असलेली स्टॅटिस प्रकल्पाच्या कामामुळे रस्ते अरुंद होत चालले आहेत. परिणामी मोट्या प्रमाणात वाहतुककोंडीत होत आहे. त्यातच रिक्षा चालकांची अरेरावी मोडून काढण्यासाठी वाहतूक पोलीस पोलिसांची स्टेशन परिसरात कडवी नजर आहे. यातूनही वाहतुककोंडी होत असेल तर अजून उपाययोजना करून ती सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. स्थानिक पोलीस प्रशासन आणि आरटीओ यांच्या मदतीने रिक्षा चालकांची अरेरावी मोडण्याचा प्रयत्न केला जाईल.

राजेश शिरसाट, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news