

ठाणे : मंगळवारी (दि.6) रोजी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह ठाण्यात सर्वत्र पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे उन्हाच्या काहीलीनंतर वातावरणात गारवा निर्माण झाला असून बुधवार (दि.7) रोजी सकाळपासून वातावरण ढगाळ दिसून येत होते त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे.