ठाणे : आधुनिक पद्धतीने केल्या जाणारा शेतीकडे वळण्यासाठी आणि शेतमालातून आर्थिक उत्पन्नवाढीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून या योजना राबविण्यात येत असून, आता शेतकर्यांना सिंचन साहित्य खरेदीसाठी 75 टक्के अनुदान देण्यात येत आहे. योजनेमुळे सिंचन पद्धतीचा वापर करू इच्छिणार्या शेतकर्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे.
शेतकर्याकडे 7/12 व 8-अ उतारा असणे आवश्यक
आधारकार्ड व बँक पासबुक सादर करणे आवश्यक.
शेतकर्यांच्या नावे शेतजमीन असण्याची आवश्यकता नाही.
वरील गोष्टींची पूर्तता असणारे जिल्ह्यातील सर्व वर्गवारीतील शेतकरी पात्र राहतील.
जिल्ह्यातील शेतकरी आता आधुनिक शेतीचा पर्याय स्वीकारत आहेत. शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. शेतीला जलसिंचन करणे हे शेतकर्यांपुढील मोठे आवाहन असते. पारंपारिक पद्धतीने पाणी दिल्यास इंधन, वेळ आणि पाण्याचा अपव्यय होतो. शेतीमध्ये सिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा वापर व्हावा म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता सेस फंड अंतर्गत शेत जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी व शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी सिंचन साहित्य पुरवठा योजना राबवली जात आहे. या योजने अंतर्गत डिझेल इंजिन,पेट्रो-डिझेल पंपसंच, पेट्रोल पंप संच, विद्युत पंपंसंच,कऊझए पाईप,झतउ पाईप, 2 कझ, 3कझ सिंगल फेज, थ्री फेज इलेक्ट्रीक मोटर व 5 कझ व 7.5 कझ थ्री फेज इलेकट्रीक मोटर या सिंचन साहित्याचा लाभ दिला जाणार आहे. प्रति लाभार्थी सिंचन साहित्य प्रति नग एकुण किंमतीच्या 75% अनुदान दिले जात आहे.
लाभार्थ्यांनी तालुका कृषि अधिकारी/ गट विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा. कागदपत्रांची छाननी तालुकास्तरीय अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येईल. पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव अंतिम मंजूरीकरिता जिल्हा स्तरावर सादर करण्यात येईल.
शेतातील उत्पादन वाढीसाठी जिल्हा परिषद सेस फंडा अंतर्गत निधी विविध सिंचन साहित्याचा पुरवठा योजनेसाठी उपलब्ध असून शेतकरी बाधंवानी या योजनेसाठी अर्ज करावे.
रामेश्वर पाचे, जिल्हा कृषी विकास अधिकारी