तलासरी : अनुसुचित क्षेत्रातील 17 संवर्ग पेसा पद भरती व्हावी म्हणून नाशिक येथे गेल्या 20 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने डीवायएफआय आणि इतर आदिवासी संघटनानी बुधवारी (दि.21) तलासरीत आंदोलन केले. आंदोलन आणखी तीव्र करून शुक्रवार, दि. 23 ऑगस्टला चारोटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदारांनी सांगितले असून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी आमदार विनोद निकोले, नगराध्येक्ष सुरेश भोये, उप नगराध्येक्ष सुभाष दुमाडा सरपंच आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनुसुचित क्षेत्रातील 17 संवर्ग पेसा पद भरती व्हावी म्हणुन आदिवासी आयुक्त नाशिक आदिवासी भवन नाशिक समोर गोल्फ मैदानावर आदिवासी समाजाचे न्याय मागणी करीता उपोषण आंदोलन सुरु आहे. परंतु शासन याकडे दुलर्श करीत आहे. आदिवासी आयुक्तांना निवेदन देऊन मोर्चे आणि आंदोलनाच्या माध्यमातून 20 ऑगस्टपर्यत शासनाने दखल घ्यावी असे निवेदन आयुक्त आदिवासी नाशिक यांना देन्यात आले होते. मात्र त्यानंतरही शासन कुठलाही तोडगा काढण्यास प्रयत्नशिल दिसत नाही. म्हणुन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डीवायएफआय व ईतर आदिवासी संघटनानी राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये बुधवार 21 ऑगस्ट पासून तीव्र आंदोलन सुरू केले आहे. पालघर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आली आहे. तलासरी येथे माकपाचे आमदार विनोद निकोल यांच्या नेतृत्वाखाली तलासरी नाका येथे आंदोलन करण्यात आले. राज्यभरातील पेसा क्षेत्रातील डीएड, बीएड विद्यार्थी नाशिक येथे उपोषणाला बसले आहेत मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
पेसा क्षेत्रात अनुसूचित जमातीचे पात्रताधारक आहेत. सरळ सेवेतून भरल्या जाणार्या 17 संवर्गापैकी काही संवर्गाच्या परीक्षा झाल्या असून काही परीक्षा अजूनही प्रलंबित आहेत. यामध्ये शिक्षक, कृषी, तलाठी, बहुआयामी आरोग्य सेवक अशा वेगवेगळ्या क्षेत्रासाठी शासनाकडून परीक्षा झाल्या. त्याचे निकाल प्रलंबित तर काही जागांवर आजही भरती प्रक्रिया झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निकाल दिला आहे. परंतु, न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ घेतला गेला. सरकारकडून अनुसूचित जाती जमातीतील संबंधित पात्रता धारकांवर अन्याय होत आहे. राज्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची भरती सरळ सेवा नियमाप्रमाणे तत्काळ व कायमस्वरूपी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची भरतीसाठी नाशिक येथे आंदोलन सुरू आहे मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. परंतु आता आमची सहनशीलता संपली असून आज पासून तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. 23 ऑगस्ट रोजी चारोटी येथे रास्तारोको आंदोलन करून सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात येणार असून आंदोलन आणखी तीव्र करून जोपर्यंत अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची भरती होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली तर त्याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील.