Thane | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात वाढले

10 वर्षात 500 जणांचा बळी; वेगमर्यादेचे उल्लंघन; आडोशीपट्टा ठरतोय मृत्यूचा पट्टा
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेला काही कालावधीत अपघात वाढले आहेतPudhari News network
Published on
Updated on

खालापूर : मनोज कळमकर

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेला काही कालावधीत अपघात वाढले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुणेकडून मुंबईकडे येताना घाट उताराचा आडोशी टप्प्यात पुन्हा अपघातात वाढ झाली आहे. द्रुतगती मार्ग अस्तित्वात येवून चोवीस वर्षे झाली आहेत. शेकडो बळी या मार्गावर गेले आहेत. बोरघाट उतरून मुंबईकडे येताना आडोशी पट्टा मृत्यूचा पट्टा म्हणून शिक्का बसला आहे. गेली बारा वर्षात सुमारे 500 नागरिकांचा बळी गेला आहे.

Summary

घाट टप्प्यामध्ये हॅलोजनची व्यवस्था, वेग मर्यादेत बदल असे प्रयोग 2023 मध्ये करण्यात आले होते. सकारात्मक परिणाम दिसून आला होता. अपघातावर काही प्रमाणात नियंत्रण आले होते. परंतु गेला दोन महिन्यांपासून पुन्हा अपघात वाढले असून दहापेक्षा अधिक अपघात या टप्प्यात घडले आहेत.

अवजड वाहने, हलकी वाहने आणि ओव्हरटेक करण्यासाठी तीन लेनची रचना आहे. खालापूर तालुका हद्दीत घाट उतरून मुंबुईकडे जाताना आडोशी उतार अपघाताचा हॉटस्पॉट बनलेला घाट उतरताना असलेली वेग मर्यादेचे पालन वाहनचालक करत नसून इंधन वाचविण्यासाठी ट्रेलर कंटेनर आणि ट्रक आणि टँकर वाहनांचे चालक वाहन न्यूट्रल करतात. यामुळे अनेकदा ब्रेक न लागणे अपघाताचे कारण होते.

घाट उतरताना हलक्या वाहनांसाठी पन्नास किमी प्रतितास तर अवजड मोठ्या वाहनांसाठी चाळीस किलोमीटर प्रतितास वेग मर्यादा आहे. परंतु सर्रासपणे वेग मर्यादेचे उल्लंघन वाहन चालक करतात. इंधन बचतीच्या नादात अवजड वाहनचालकांकडून न्यूट्रल गिअरमुळे उतार व वळणावर वाहन अनियंत्रित होते. बंद पडलेले वाहन हे देखील अपघाताचे कारण आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात प्रवण पट्ट्यात घाटातून मुंबईच्या दिशेने जाताना खालापूर टोल नाक्यापर्यंत साधारण आठ, किलोमीटरची चौथी लेन तयार करण्यात आली असून ही लेन केवळ अवजड वाहनांच्या वापरासाठी ठेवण्यात आली आहे. परंतु लेनची शिस्त पाळली जात नसल्याने अपघात वाढले आहेत. मिसिंग लिंकमुळे अपघात पट्टा वगळला जाणार असून वेळेत बचत होणार असली तरी अजून मिसिंग लिंक अस्तित्वात येण्यास बराच अवधी जाणार आहे.

रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग हे तीन प्रमुख महामार्ग जात आहेत. याव्यतिरिक्त जिल्हाभरात विविध राज्यमार्ग व जिल्हा मार्गांचे जाळे आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात आकडेवारी-खालापूर हद्द

  • 2013- एकूण अपघात 198, मृत्यू- 49, जखमी 91

  • 2014- एकूण अपघात 211, मृत्यू- 53, जखमी-96

  • 2015- एकूण अपघात-203, मृत्यू- 63, जखमी- 45

  • 2016- एकूण अपघात- 131, मृत्यू-38, जखमी-70

  • 2017- एकूण अपघात- 168, मृत्यू-43, जखमी-97

  • 2018-एकूण अपघात- 192, मृत्यू- 36, जखमी-78

  • 2019- एकूण अपघात- 220, मृत्यू-40, जखमी-144

  • 2020- एकूण अपघात-101, मयत 30, जखमी- 63

  • 2021- एकूण अपघात 138, मयत 54, जखमी 73

  • 2022 - एकूण अपघात-117, मयत 48, जखमी -94

  • 2023- एकूण अपघात-85, मयत 25,जखमी -38

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अपघात

  • 2018- एकूण अपघात- 98, मृत्यू 28, जखमी-59

  • सप्टेंबर - 2019, एकूण अपघात- 65, मृत्यू-16, जखमी-65

  • 2020 एकूण अपघात- 39,23 मयत, 18 गंभीर जखमी

  • 2021 एकूण अपघात 62, मयत 23, जखमी 33

  • 2022 - एकूण अपघात-80, मयत 29, जखमी 100

  • 2023- अपघात-69, मयत 32, जखमी 72

  • 2024 (नोव्हेंबर पर्यंत) एकूण अपघात-45, मयत 30, जखमी 65

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news