उल्हासनगर : कल्याण-बदलापूर महामार्गावर मंगळवारी (दि.27) रोजी सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात अंबरनाथहून कल्याणच्या दिशेने वेगाने जाणार्या ट्रकचे नियंत्रण सुटल्याने नऊ वाहनांना चिरडल्याने वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये रिक्षा आणि मोटार सायकलचा सामावेश आहे.
या घटनेप्रकरणी एका रिक्षाचालकाने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी ट्रकचालक व ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान आरोपीला मिरगीचा आजार असल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात झाल्याचे समजते. मिरगीचा आजार असल्याचे माहीत असूनही ट्रान्स्पोर्ट मालकाने आरोपी ट्रक चालकाला नोकरीवर ठेवले होते. मंगळवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प 3 येथील कल्याण-बदलापूर महामार्गावर अंबरनाथहून कल्याणच्या दिशेने वेगाने जाणार्या ट्रकचा वाहन चालक राजेश इंद्रजीत यादव (35) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. डर्बी हॉटेल समोरील 3 ते 4 रिक्षा ज्या स्टँडवर उभ्या असताना 5 दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही वाहनचालक आणि प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.
या अपघातामुळे बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पथक आणि वाहतूक पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले व स्थिती पूर्ववत आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी ज्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. रिक्षाचालक बबन विष्णू आव्हाड (42) यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी राजेश यादव यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली असता पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगरमध्ये घडलेल्या अपघात प्रकरणी करण्यात आलेल्या पोलीस तपासात आरोपी राजेश यादव याला मिरगीचा आजार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या दुर्घटने दरम्यान देखील आरोपी ट्रक चालक यादवला मिरगीचा झटका आला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तर आरोपीला मिरगीचा आजार आहे, हे माहीत असूनही ट्रान्स्पोर्ट कंपनीचा मालकाने आरोपीला ट्रक चालकाची नोकरी दिली होती. या अपघाता
दरम्यान ट्रक चालकास मिरगीचा अॅटॅक आल्याकारणामुळे यावेळी अपघात घडल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी मनवानी याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आशा निकम या करीत आहेत.