पनवेल : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर किमी 8/900 पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत 5 ऑगस्ट रोजी रात्री बाराच्या सुमारास विचित्र अपघात झाला. यामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे तर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातील स्कुटी मोटार सायकल क्रमांक एम एच 46 बीएक्स 4482 वरील चालक आनंद धारमु विरकर (वय 42, सेक्टर 17, कामोठे) हे मुंबई पुणे महामार्गावर मुंबई बाजूकडे नो एन्ट्री मध्ये तिसर्या लेनने स्कुटी मोटार सायकल चालवीत घेऊन जात होते. कि.मी. 8/900 या ठिकाणी आले असता मोटार सायकल चालकाने स्कुटी अचानक दुसर्या लेनवर घेतल्याने त्याच्या पाठीमागून दुसर्या लेनने चालणारी कार क्र. एम एच 12 टिके 9302 वरील चालक रिझवान खान (वय 25 वर्ष रा.किसोली पुणे) याचे ताब्यातील वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी समोर चालवीत जात असलेली मो.सा. स्कुटीला जोरात ठोकर मारल्याने मो.सा. वरील चालक हा पहिल्या लेनवर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला आयआरबी अम्ब्युलन्समधील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
या अपघातातील कार दुसर्या लेनवर उभी असल्याने पाठीमागून येणारा आयसर टेम्पो क्र एम एच 12 व्हीएफ 0158 वरील चालक धीरज प्रजापती (वय 24 वर्ष रा. संगमवाडी पुणे) याने वाहनाचा वेग कमी केल्याने त्याच्या पाठीमागून येणारा ट्रक.क्र. टीएन 57 सीवाय 8436 वरील चालक दिनाकारण (वय 25 वर्ष रा. तामिळनाडू) याला आपला ट्रक नियंत्रित न झाल्याने पुढे असलेल्या आयसर टेम्पोला पाठीमागून जोरात ठोकर मारली व आयसर टेम्पो उजव्या बाजूला पहिल्या लेनच्या रेलिंगला जोरात आपटल्याने आयसरचे पुढील कॅबिन दाबल्याने आयसर वरील चालकाचा पाय अडकला. त्याला आयआरबी फायर ब्रिगेड यांच्या मदतीने पत्रा कापून बाहेर काढण्यात आले. चालकाच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे पाठवण्यात आले. पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत.