Thane double decker bus : डबल डेकर बस अखेर ठाण्यात दाखल

महाराष्ट्र दिनी होणार अनौपचारिक उद्घाटन; ठाणे परिवहनच्या उत्पन्नातदेखील भर पडणार
Double Decker Bus
Double Decker BusPudhari
Published on
Updated on

ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली डबलडेकर बस अखेर ठाण्यात दाखल झाली आहे. टीएमटीच्या इतिहासात प्रथमच एसी डबलडेकर बस धावणार आहे. येत्या सहा महिन्यांत एकूण दहा बस ताफ्यात दाखल होणार त्यामुळे ठाणेकरांना ऐसपैस सेवा मिळणार आहे. उद्या महाराष्ट्र दिनी नव्या आकर्षक डबलडेकर बसचे अनौपचारिक उद्घाटन होणार असून त्यानंतर आठ ते दहा दिवसांतच प्रत्यक्षात घोडबंदर रोडवरून ही बस मोठ्या ऐटीत धावताना दिसणार आहे. एसी डबलडेकर बसमुळे ठाणे परिवहनच्या उत्पन्नातदेखील भर पडणार आहे.

गेल्या काही वर्षांत ठाणे शहराचा विस्तार झपाट्याने झाला असून टीएमटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. सध्या टीएमटीच्या ताफ्यात ४०७ बस असून प्रत्यक्षात ३८० बस सेवा देत आहेत.

Double Decker Bus
Double Decker Bus: ठाण्याच्या रस्त्यांवर येत्या 15 दिवसांत धावणार डबल डेकर; ठाणेकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार

परिवहनचे रोजचे उत्पन्न अंदाजे २६ ते २७ लाख रुपये एवढे आहे. अनेक दिवसांपासून ठाण्यात मुंबईप्रमाणे डबलडेकर बस येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर बुधवारी रात्री उशिरा ही बस आनंदनगर डेपोमध्ये आली. आज आरटीओमार्फत या बसची संपूर्ण तपासणी करण्यात आली असून सेवेसाठी आवश्यक असलेली औपचारिकताही पूर्ण झाली आहे.

Double Decker Bus
Satara Pune highway: सरकारला वेठीस धरणाऱ्यांना ठेका नको

नवीन डबलडेकर बस पूर्णपणे वातानुकूलित असून खाली ३६ व वर २९ एवढ्या सीट्स आहेत. प्रवाशांची एकूण क्षमता ६५ एवढी असून चालकाला विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या बसमध्ये चढण्यासाठी दोन व उतरण्याकरिता दोन दरवाजे असल्याने गर्दी होणार नाही. तसेच प्रवाशांना प्रवास करताना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी घेण्यात आली असल्याची माहिती परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी दिली.

प्रत्येक आसनामागे मोबाईल चार्जिंगची व्यवस्था

डबलडेकर बसमधील प्रत्येक आसनामागे मोबाईल चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होईल. या बसचे परिचलन सिटी लाइफलाइन ट्रॅव्हल्स प्रा. लि. या कंपनीमार्फत होणार आहे. बसेसची संपूर्ण देखभाल व दुरुस्तीचा भारही कंपनीवर राहील. उद्या १ मे रोजी नव्या डबलडेकर बसचे औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर दहा ते बारा दिवसांत प्रत्यक्षात ही बस धावणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news