Thane Aayush Hospital : ठाण्यात स्वतंत्र जिल्हा आयुष रुग्णालय

वागळे इस्टेट येथे रुग्णालयाचे बांधकाम लवकरच सुरू होणार; 50 खाटाच्या हॉस्पिटलमध्ये आयुर्वेद, होमोयोपॅथी, युनानी, योगाचे उपचार
Thane Aayush Hospital
जिल्हा आरोग्य प्रशासनाने रुग्णांची गरज ओळखून स्वतंत्र आयुष रुग्णालय ठाण्यात उभारणार आहे. Pudhari News network
Published on
Updated on

ठाणे : आयुर्वेदिक उपचार पद्धतीने गुण येण्यास काहीसा विलंब होत असला तरी, आयुर्वेदिक उपचार घेण्याकडे कल वाढतो आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने रुग्णांची गरज ओळखून स्वतंत्र आयुष रुग्णालय ठाण्यात उभारणार आहे.

Summary

वागळे इस्टेट येथील सिव्हील रुग्णालयाच्या प्रांगणात 50 खाटांच्या जिल्हा आयुष रुग्णालयात आयुर्वेदिक, होमियोपॅथी, युनानी श्रसारख्या उपचार पद्धतीने रुग्णांवर उपचार होतील. त्यामुळे पंचकर्म सेंटर, शिरोधारा, वमन बस्ती सारखे उपचार सर्वसामान्य रुग्णांना घेता येणार आहेत.

अ‍ॅलोपॅथी उपचारा इतकेच आयुर्वेदिक उपचारावर विश्वास ठेवणार्‍या रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळें दीर्घ आजार असणारे अनेक रुग्ण आयुर्वेदिक उपचार पद्धतीकडे वळताना दिसतात. आता ठाण्यात जिल्हा आयुष रुग्णालय उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय आयुष अभियाना अंतर्गत जिल्हा आयुष रुग्णालयाच्र काम येत्या काही दिवसातच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. वागळे इस्टेट येथील सिव्हील रुग्णालयाच्या परिसरात आयुष रुग्णालय बांधण्यासाठी 15 कोटी मंजुर झाले आहेत. रुग्णालयाची संरचना, मनुष्यबळ, साधन सामुग्री, औषधी व निवासस्थाने इत्यादींचा सविस्तर कृती आराखडा बनवण्यात आला आहे. रुग्णालयात योगा, प्रतिक्षालय, अभिलेख, प्रक्रिया, मुख्य वैद्यकीय कक्ष आयुर्वेद कक्ष, स्वच्छता गृह, होमियोपॅथी कक्ष, युनानी, नॅचेरोपॅथी, आदी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच पंचकर्म, क्षारसूत्र आदी इतर आयुष उपचार होणार आहेत.

असा असेल आराखडा

2817,12 चौ. मी. जागेत जिल्हा आयुष रुग्णालय उभ रहाणार आहे. तळ मजल्यावर बाह्य विभाग (ओपीडी) आणि ऑफिस, पहिला मजला योगा हॉल, कॅन्टीन, गर्भ संस्कार हॉल आहे. दुसर्‍या मजल्यावर पुरुष कक्ष तर तिसर्‍या मजल्यावर महिला कक्ष, परिचारिका कक्ष आदी असणार आहे.

भारतात प्राचीन काळापासून आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार, आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो. अ‍ॅलोपॅथी उपचारात रुग्णाला झटपट रिझल्ट मिळत असला तरी आयुर्वेद, होमियो पॅथी, युनानी सारख्या उपचारांनी रुग्णांना आराम मिळतो.

डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक ठाणे

मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब सारख्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेणे सर्वांना परवडत नाही. मात्र सिव्हील रुग्णालयात आयुष हॉस्पिटल होत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी आयुर्वेदिक, होमियोपॅथी, युनानी, योगा सारखे उपचार मिळणार असल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी आनंदाची गोष्ट आहे.

पुंडलिक घाग (ठाणे पूर्व)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news