

नालासोपारा : मनसे पदाधिकाऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवल्याने कुर्ला बस दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली असून मद्यधुंद अवस्थेतील चालकाला यथेच्च चोप देवून मांडवी पोलिसांच्या हवाले ट्रक ची चावी देण्यात आली आहे. या घटनेमुळे महामार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मनसेचे शाखा क्रमांक 38 चे विभाग अध्यक्ष गिरीश मोडकले चे डहाणू वरून विरार कडे येत असताना वरई फाट्याच्या पुढे ऐक कंटेनर ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता त्याचा त्रास इतर गाड्यांना देखील होत होता, ते आमच्या लक्षात येताच गाडी साईड लावण्यास सांगितले पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता थोड पुढे गेल्यानंतर त्यांनी गाडी ऐक डिव्हायडर ला ठोकली त्यानंतर आम्ही त्याची गाडी साईटला घेतली, आणि त्या नंतर एखाद्याच्या जीवाशी खेळण काय असत त्याच योग्य उदाहरण महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष प्रभाग 38 मधील गिरीश मोडकले. आणि निखिल नकती यांनी चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केलं आणि पोलिसांनी व इतर गाडी चालकांनी आभार मागितले. मात्र या घटनेच्या वेळी महामार्ग पोलीस नक्की काय करीत होते असा सवाल उपस्थित होत आहे. येथील महामार्ग पोलीस वेगळ्याच कामात गुंग असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर राज्यभरातून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असते. या ठिकाणी यापुर्वी अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ड्रंक आणि ड्राईव्हच्या घटना रोखण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.