ठाणे : विनागणवेशधारी रिक्षावाला निघाला रिक्षाचोर

रिक्षा चोरट्याचे बिंग गणवेश न घातल्यामुळे फुटले
रिक्षाचोर
रिक्षा चोरट्याचे बिंग केवळ त्याने गणवेश न घातल्यामुळे फुटले. pudhari news network
Published on
Updated on

डोंबिवली : एका रिक्षा चोरट्याचे बिंग केवळ त्याने गणवेश न घातल्यामुळे फुटले. तांत्रिक तपासणीदरम्यान डोंबिवली शहर वाहतूक पोलिसांचा या रिक्षावाल्यावरील संशय बळावला. सखोल चौकशी केली असता या रिक्षावालाच चोर निघाल्याचे तपासात निष्पन्न झाले.

बदलापूरमधून त्याने रिक्षा चोरल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी रिक्षासह राजेंद्र अजिनाथ जाधव (42, रा. काटई-बदलापूर, कोळेगाव) या चोरट्याला बदलापूर पोलिसांच्या हवाली केले आहे.

डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण उपविभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनंत कदम, हवालदार शशिकांत गांगुर्डे आणि पोना. गणेश कोळी हे रामनगर परिसरात वाहतूक नियंत्रणासह कारवाई करत असताना रिक्षाचा चालक विनागणवेश आढळून आला. रिक्षाच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. हवालदार शशिकांत गांगुर्डे यांनी त्यांच्याकडील ई-चलन मशीनद्वारे रिक्षाच्या मूळ मालकाबाबत माहिती काढली असता रिक्षावाल्याचा प्रताप उघडकीस आला. पोलिसांनी सदर रिक्षाचे मालक प्रसाद गुरूनाथ माळी यांच्याशी संपर्क साधला असता सदर रिक्षा 18 ऑगस्टपासून बदलापूर येथून चोरी झाल्याचे समोर आले.

यापूर्वी चार गुन्हे दाखल

अटक आरोपी राजेंद्र जाधव याच्या विरोधात डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात 2017 पासून 2023 पर्यंत लुटीसह 3 चोर्‍या, असे एकूण 4 गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news