ठाणे : कल्याण-डोंबिवलीवर पसरली गडद धुक्याची झालर

परतीच्या पावसाचे संकेत, लोकलचा वेग मंदावला
कल्याण डोंबिपली, नेवाळी, ठाणे
नेवाळी : सोमवारी (दि.16) अचानक धुकं पसरलेल दिसून आलं. पावसाळ्यात अचानक येणारे हे धुके बळीराजाला पावसाच्या परतीच्या मार्गाचा संदेश देतात अशी ग्रामीण भागात आख्यायिका आहे. (छायाः शुभम सांळुखे)
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात सोमवारी (दि.16) पहाटे दाट धुक्याची झालर पसरलेली पहायला मिळाली. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला. मात्र हवेची गुणवत्ता मात्र खालवल्याचे QI INDEX निर्देशांकावरून दिसून आले आहे. तर मध्य रेल्वे मार्गावरही धुक्याची चादर पसरल्याने लोकल उशिराने धावत होत्या. अचानक उद्भवलेल्या धुक्यामुळे परतीच्या पावसाने संकेत दिल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले.

पहाटे चार-साडेचार वाजल्यापासून वातावरणात धुक्याची दाट चादर तयार झाली होती. पहाटेच्या सुमारास पसरलेल्या धुक्यामुळे वाहन चालकालाही पाच फुटाच्या पलीकडील रस्ता दिसत नव्हता. वाहनाचे पुढील दिवे लावून चालक रस्त्यावरून पुढे जाताना दिसत होते. असाच प्रकार लोकलच्या बाबतीत झाला होता.

कल्याण-डोंबिवलीतील गगनचुंबी इमारती धुक्यात हरवून गेल्याचे दिसून आले. सकाळच्या सुमारास नियमितपणे बाहेर पडलेल्या नागरिकांना या धुक्यामुळ सुखद धक्का बसला. त्यामुळे सोमवारची सकाळ आपल्यासाठी काहीशी स्पेशल ठरल्याचे सार्‍यांना जाणवले. एअर क्वालिटी इंडेक्स अर्थातच हवा गुणवत्ता निर्देशांक तपासला असता तो 166 अंकांवरती पोहोचल्याचे दिसून आले.

दमा, अस्थमा सारखे आजार असलेल्या व्यक्तींसह सामान्य नागरिकांसाठी श्वास घेण्यास चांगला नसल्याचेच निर्देशांकाचे हे आकडे दर्शवत आहेत. त्यामुळे पहाटेच्या सुमारास नागरिकांनी घराबाहेर पडताना धुक्याचा आनंद जरूर घ्यावा, मात्र त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजीही घ्यावी असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळींकडून करण्यात आले आहे. दरम्यान वासिंद ते टिटवाळा आणि कर्जत ते बदलापूर स्थानकांच्या दरम्यान धुक्याची चादर रेल्वे मार्गावर पसरली होती. त्यामुळे या दिशेकडून मुंबईकडे जाणार्‍या, तसेच मुंबईहून कर्जत-कसार्‍याकडे जाणार्‍या लोकल 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. निसर्गाच्या अशा हुलकावणीमुळे मध्य रेल्वे मार्गावर धावणार्‍या लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे.

धुक्यामुळे लोकलची धाव मंदावली

रात्री उशिरापासून सकाळपर्यंत धुक्याची दाट चादर वातावरणात तयार झाल्याने मध्य रेल्वेच्या कर्जत, कसारा, बदलापूर, आसनगाव, टिटवाळा भागातून सीएसएमटीकडे धावणार्‍या लोकल 15 मिनीटे उशिराने धावत होत्या. अनियमित वेळेने लोकल धावत असल्याने कल्याण-डोंबिवली फलाटांवर येणार्‍या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत होती.

मोटरमनचा सावध पावित्रा

वातावरणात धुक्याची गडद चादर तयार झाल्यामुळे कर्जत, कसारा, बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, आदी भागातून येणार्‍या लोकल डोंगर-दर्‍यांतून येत असल्याने या भागात धुक्याचे प्रमाण अधिक असते. या धुक्यामुळे मोटरमनला पाच फुटाच्या पलीकडील काही दिसत नसल्याने दिव्यांच्या प्रखर झोतात मोटारमन हळूहळू लोकल पुढे नेतात. अशा धुक्यात लोकल वेगाने चालविली तर अपघाताची शक्यता असते. धुक्याची चादर तयार झाली की मोटरमन हळूहळू लोकल चालवतात. परिणामी उशिराने धावत असल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडून पडत असल्याचे एका रेल्वे अधिकार्‍याने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news